बॉलिवूडमध्ये प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी चित्रपट तयार केले जातात. सेंसॉर बोर्ड चित्रपटाच्या कथेवरुन त्यांना सर्टिफिकेट देताना दिसतो. ज्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स, हिंसा आणि मॅच्युअर कंटेन्ट असतो ते चित्रपट केवळ अडल्ट लोकांसाठी असतात. सेंसॉर्ड बोल्ड अशा चित्रपटांना ए-सर्टिफिकेट देतात. ए-रेटेड चित्रपटांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आता तेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार आहेत. चला पाहूया या यादीमधील चित्रपट...
अभिनेता अक्षय कुमारचा 'ओएमजी २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. चित्रपटाने १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. सेक्स एज्युकेशनवर आधारित हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
२०२२ सालात प्रदर्शित झालेला आणि चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे द कश्मीर फाइल्स. १९९० साली कश्मीरी पंडितांच्या पलायनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
वाचा: बिग बींनी सूनबाई ऐश्वर्या रायला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, काय आहे कारण?
कबीर सिंह हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटात ड्रग्स घेणारा आणि दारु पिणाऱ्या कॉलेजमधील मुलाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे.
सेक्स सिंबॉल म्हणून ओळली जाणारी अभिनेत्री सिल्क स्मिताची कहाणी द डर्टी पिक्चरमध्ये दाखवण्यात आली आहे. ती चित्रपटातील इरॉटिक भूमिकांसाठी विशेष ओळखली जात होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.
अनुराग कश्यप दिग्दर्शित गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दोन गँगस्टर कुटुंबामधील वैर दाखवण्यात आले आहे.
डेल्ही बेली या चित्रपटात संघर्ष करणाऱ्या तिघांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे
संबंधित बातम्या