रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार हे रंगभूमीवर स्वत:ला एका वेगळा रुपात पाहतात. 'अ परफेक्ट मर्डर' हे नाटक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या नाटकातील एका अभिनेत्रीचे पुनरागमन झाले आहे. 'अ परफेक्ट मर्डर' हे नाटक गाजत आहे. या नाटकात अनिकेत विश्वासराव आणि पुष्कर क्षोत्री दिसत आहेत. त्यांच्यासोबत आता एका अभिनेत्रीचे पुनरागमन झाले आहे. ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
'अ परफेक्ट मर्डर' हे नाटक गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत आहे. या नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला आता ट्विस्ट देण्यासाठी एका अभिनेत्रीचे पूनरागमन झाले आहे.
आपल्या उत्तम आणि सयंत अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. आता 'अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी तिने खाकी वर्दी चढवली आहे. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे. खूप कमी सस्पेन्स नाटकं मनाचा ठाव घेतात, नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत नाटाकाची रंजकता वाढावी लागते. श्वेताच्या येण्याने नाटकाला काय कलाटणी मिळणार? ती खुनाचा कट ‘परफेक्ट’ उलगडू शकेल का? हे पाहणं नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचं वैशिष्टय असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत दिसणार असून तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे.
वाचा: इंडियन आयडल जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचे अभिजीत सावंतने काय केले? वाचा सविस्तर
'अ परफेक्ट मर्डर' या नाटकाचा हा ३४५ प्रयोग असून ऑपेरा हाऊस मधील ५ व्या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस हे आहेत. या नाटकाचे लेखन आणि नेपथ्य नीरज शिरवईकर यांचं आहे. संगीत अजित परब यांचे आहे.
संबंधित बातम्या