Amitabh Bachchan discharged : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शुक्रवारी सकाळी सहा वाजता अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमध्ये चढउतार सुरू आहेत. नुकतीच त्यांच्या पायाला झाली होती. त्यातून ते बरे झाले होते. त्यापाठोपाठ आज, शुक्रवारी सकाळी सहा वाजता कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben ambani Hospital) अँजियोप्लास्टी करण्यात आली.
ई टाइम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळीच अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची अँजियोप्लास्टी हृदयावर नसून पायातील गाठीवर करण्यात आली आहे. अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजताच त्यांचे लाखो चाहते काळजीत पडले होते. अमिताभ यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा व त्यांना डिस्चार्ज मिळावा यासाठी चाहते प्रार्थना करत होते.
सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे. 'तुम्हा सगळ्याचे आभार' असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शस्त्रक्रिया उत्तम झाली असून मी ठणठणीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा: ‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू
काल गुरुवारी अमिताभ हे अभिषेक याच्यासोबत इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) स्पर्धेतील 'माझी मुंबई' या त्यांच्या टीमला चीअर्स करताना दिसत होते. अमिताभ यांच्या मालकीच्या टीमनं आयएसपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
वयाच्या ८१ व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीत सक्रिय असून अनेक तरुण कलाकार त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. लवकरच ते दीपिका पादुकोन व प्रभास यांच्या सोबत एका सिनेमात झळकणार आहेत.
संबंधित बातम्या