(1 / 5)मराठी चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन काही वर्षे उलटली आहेत. मात्र आजही प्रेक्षक ते चित्रपटात तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने पाहातात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'सैराट.' २०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. पण तुम्हाला माहिती आहे का आर्ची या भूमिकेसाठी वेगळ्या अभिनेत्रीची निवड झाली होती.