Marathi Movie On OTT: देहदानाचे महत्त्व सांगणारा ‘८ दोन ७५’ चित्रपट ओटीटीवर रिलीज! कुठे बघता येणार? वाचा...-8 don 75 marathi movie released on ott platform when and were to watch know here ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Movie On OTT: देहदानाचे महत्त्व सांगणारा ‘८ दोन ७५’ चित्रपट ओटीटीवर रिलीज! कुठे बघता येणार? वाचा...

Marathi Movie On OTT: देहदानाचे महत्त्व सांगणारा ‘८ दोन ७५’ चित्रपट ओटीटीवर रिलीज! कुठे बघता येणार? वाचा...

Aug 21, 2024 11:20 AM IST

8 Don 75 Marathi Movie On OTT: देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात, हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे.

8 Don 75 Marathi Movie On OTT
8 Don 75 Marathi Movie On OTT

8 Don 75 Marathi Movie On OTT: अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. ‘८ दोन ७५’ म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या लक्षात आलं होतं. अनेकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहिला होता. आता हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट आता अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे.

८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतलेला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात, हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा चित्रपट आहे.

8 Don 75: '८ दोन ७५' नेमकं आहे तरी काय? नव्या मराठी चित्रपटाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

चित्रपटाने गाजवलाय परदेश!

फ्रान्स, सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पद्दुचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९०पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. एका आगळ्यावेगळ्या व संवेदनशील विषयावर आधारित हा चित्रपट आहे.

दमदार कलाकारांची फौज

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी-सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९०पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

विभाग