मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  75 years of Independence: भारतीय नौदलासोबत सलमान खानने फडकावला तिरंगा, जपला देशाभिमान

75 years of Independence: भारतीय नौदलासोबत सलमान खानने फडकावला तिरंगा, जपला देशाभिमान

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 11, 2022 12:53 PM IST

salman khan with indian navy: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तो भारतीय नौदलाच्या जवानांसोबत तिरंगा फडकवताना दिसतोय.

सलमान खानने फडकावला तिरंगा
सलमान खानने फडकावला तिरंगा

salman khan hoisted indian flag with navy: सलमान खान सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याचे काही फोटो नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सलमान सध्या विशाखापट्टणम येथे आहे. तो त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तेथे गेला होता. अशातच त्याचे तिथले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

salman khan with indian navy

salman khan with indian navy

हे फोटो पाहून चाहतेही त्याचं कौतुक करत आहेत. या फोटोंमध्ये तो भारतीय नौदलाच्या जवानांच्या मध्ये दिसत आहे. सलमानने आपला संपूर्ण दिवस नौदलाच्या जवानांसोबत घालवला आणि त्यांच्यासोबत खूप मस्ती केली होती. आता त्याचे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत. या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते आहे.

salman khan with indian navy

salman khan with indian navy

फोटोंमध्ये, सलमान नौदलाच्या जवानांमध्ये दिसत आहेत. त्याने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे. यासोबतच त्याने भारतीय नौदलाची टोपीही घातली आहे. हातात तिरंगा घेऊन सलमान खान जवानांसोबत मस्ती करत आहे.

salman khan with indian navy

salman khan with indian navy

सलमानच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडत आहेत. एका फोटोत सलमानही पुशअप्स करताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, 'जय हो.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं, 'सर्व सुपरस्टार एकत्र आलेत.' दुसऱ्याने लिहिले, 'भाऊ अभिमान आहे.'

salman khan with indian navy

salman khan with indian navy

salman khan with indian navy

salman khan with indian navy

सलमानने नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्याने जहाजात जेवण शिजवण्यासह सैनिकांना येणाऱ्या समस्यांबाबतही माहिती घेतली. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच 'टायगर ३' या चित्रपटात दिसणार आहे. सलमान पुढील महिन्यात त्याच्या 'भाईजान' चित्रपटाच्या पुढील शेड्यूलचं शूटिंग करणार आहे.

salman khan with indian navy

salman khan with indian navy
IPL_Entry_Point