माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज १६ ऑगस्ट रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२च्या विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. २०२२-२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. चित्रपटसृष्टी दरवर्षी या पुरस्काराची वाट पाहत असते. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कारही सिनेप्रेमींसाठी खूप महत्त्वाचे असतात. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आणि कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला हे जाणून घेऊया...
सर्वोत्कृष्ट तेलुगु फिल्म- कार्तिकेय 2
सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पीएस-1
सर्वोत्कृष्ट कन्नड़ फिल्म- केजीएफ 2
सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म- गुलमोहर
सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म- वाळवी
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- आट्टम (मलयालम)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- सूरज बड़जात्या (ऊंचाई)
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक- प्रमोद कुमार- फौजा (हरियाणवी फिल्म)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शक- केजीएफ 2
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन- ब्रह्मास्त्र 1- धर्मा
सर्वोत्कृष्ट डायलॉग्स- गुलमोहर
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- पीएस-1
सर्वोत्कृष्ट म्यूजिक दिग्दर्शक- प्रीतम- ब्रह्मास्त्र-1
सर्वोत्कृष्ट म्यूजिक दिग्दर्शक बॅकग्राउंड- एआर रहमान- पीएस-1
सर्वोत्कृष्ट साउंड डिझायन- एआर रहमान- पीएस-1
सर्वोत्कृष्ट मेल सिंगर- अरिजीत सिंह-केसरिया- ब्रह्मास्त्र-1
सर्वोत्कृष्ट अभिनेता- ऋषभ शेट्टी- कांतारा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- नित्या मेनन- तिरूचित्रमबलम
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मानसी पारेख- कछ एक्सप्रेस (गुजराती फिल्म)
सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री- नीना गुप्ता-ऊंचाई
सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेता- पवन राज मल्होत्रा- फौजा (हरियाणवी फिल्म)
सर्वोत्कृष्ट फिल्म क्रिटिक- दीपक दुआ
वाचा: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म- बीरुबाला, हरगिला (असम)
सर्वोत्कृष्ट स्क्रिप्ट- कौशिक सरकार- मोनो नो अवेयर
सर्वोत्कृष्ट म्यूजिक दिग्दर्शन- विशाल भारद्वाज-फुर्सत हिंदी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - मॅरियम चँडी- फॉर्म दे शेडो
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (30 मिनट)- औन्येता (असम)
सर्वोत्कृष्ट नॉन फीचर सोशल- ऑन द ब्रिंक सीजन 2 - गरियाल
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री- मॉर्मस ऑफ द जंगल (मराठी)
७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांची यादी जाहिर करण्यात आली. यंदा दाक्षिणात्य चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवी चित्रपटाला मिळाला आहे.