ओह माय गॉड! प्रसिद्ध अभिनेता गोविंद नामदेव यांचे नाव ३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्मासोबत गेल्या काही दिवसांपासून जोडले जात आहे. शिवांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ७० वर्षीय गोविंद यांच्यासोबतचा फोटो शेअर करत खळबळ उडवली. तिने हे फोटो शेअर करत, 'प्रेमात वय नसतं आणि कोणतीही मर्यादा नसते' असे दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवांगीची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. त्यांचा फोटो पाहून अनेकजण ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले. आता या सगळ्यावर गोविंद यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल होणारे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी त्यांचे नाते हे केवळ कमासंबंधीत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांचे केवळ पत्नी सुधा नामदेववर प्रेम असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सध्या सुरु असलेल्या या सर्व अफवा आहेत.
शिवांगीने शेअर केलेला फोटो गोविंद यांनी पुन्हा शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, 'हे रिअल लाईफ लव्ह नाही, रील लाईफ आहे. गौरीशंकर गोहरगंड वाले यांचा एक चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण आम्ही इंदूरमध्ये करत आहोत. हे त्याच चित्रपटाचे कथानक आहे. यात एक म्हातारा एका तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. हे व्हायरल होणाऱ्या फोटोमागचे सत्य आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्यांदा प्रेमात पडणे मला शक्य नाही' असे कॅप्शन गोविंद यांनी दिले आहे.
पुढे ते म्हणाले, 'माझी पत्नी, सुधा माझ्या आयुष्याचा श्वास आहे. माझ्या संसारातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लाभ-लोभ, अगदी स्वर्गही तिच्या पुढे फिका आहे. जर मी इतर कुणाचा विचार केला तर मला देवाशी लढावे लागेल. काहीही झालं तरीही मी तिची साथ सोडू शकत नाही.'
शिवांगीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ही व्यक्तिरेखा तिच्या रिअल लाईफ व्यक्तिमत्त्वापेक्षा खूप वेगळी आहे. या भूमिकेसाठी तिला मानसिक तयारी करावी लागली. ती दिग्दर्शक, लेखिका यांच्याबरोबर बसून समजून घेत होती.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?
गोविंद बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारताना दिसला आहे. सत्या, सिंघम, बँडिट क्वीन यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले असून त्यांचे कामही चांगलेच गाजले आहे.