695 Review: अयोध्येतील राम मंदिराची ५०० वर्षांची संघर्ष कथा! नेमका काय आहे ‘६९५’ चित्रपट? वाचा...-695 movie review in marathi ram mandir sangharsh katha on big screen must read storyline ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  695 Review: अयोध्येतील राम मंदिराची ५०० वर्षांची संघर्ष कथा! नेमका काय आहे ‘६९५’ चित्रपट? वाचा...

695 Review: अयोध्येतील राम मंदिराची ५०० वर्षांची संघर्ष कथा! नेमका काय आहे ‘६९५’ चित्रपट? वाचा...

Jan 21, 2024 10:41 AM IST

695 Movie Review In Marathi: ५०० वर्षांच्या मोठ्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हाच संघर्षमय प्रवास ‘६९५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

695 Movie Review In Marathi
695 Movie Review In Marathi

695 Movie Review In Marathi: अयोध्येत पार पाडणारा प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापनेचा भव्य सोहळा जगभरातील रामभक्तांसाठी एखाद्या उत्सवासारखा आहे. ५०० वर्षांच्या मोठ्या संघर्षानंतर प्रभू श्री राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हाच संघर्षमय प्रवास ‘६९५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘६९५’ या चित्रपटाचं कथानक ६ डिसेंबर १९९२ रोजी ढासळलेली बाबरी मस्जिद, ९ नोव्हेंबर २०१९ रोजी आलेला न्यायालयाचा निकाल आणि ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराची पायाभरणी याभोवती फिरते. यामुळे चित्रपटाचे शीर्षक देखील '६९५’ ठेवण्यात आले आहे.

काय आहे ‘६९५’चं कथानक?

‘६९५’ या चित्रपटाची कथा १५२८च्या कालखंडात सुरू होते, जेव्हा मुघलांनी अयोध्येतील रामाचे मंदिर पाडले आणि बाबरी मशीद बांधली होती. त्यानंतर कथेत लीप येतो आणि कथानक १९४३पासून सुरू होते. यात एक प्रसंग आहे ज्यात, गुरु राघवदास आपल्या शिष्यांसह भगवान श्री रामाची पूजा करत होते. त्याचवेळी मुस्लीम समाजातील काही लोक शंख आणि घंटांचा आवाज आपल्या नमाजमध्ये अडथळा ठरत असल्याचे सांगत पूजेला विरोध करतात. गुरू राघवदास त्यांचे शिष्य रघुनंदन यांच्यासह मुस्लिम समाजातील लोकांना भेटतात आणि मंदिर-मशीद वाद कायमचा संपवण्याच्या मार्गावर चर्चा करतात. परंतु, मुस्लिम समाजातील लोक तसे करण्यास नकार देतात. १९४९ साली मशिदीत भगवान श्रीरामाची मूर्ती अचानक प्रकट होते आणि या ठिकाणाला वादग्रस्त ठिकाण ठरवून मंदिराला कुलूप लावले आणि निर्णय कोर्टावर सोडला जातो.

Nora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही झाली डीपफेकची शिकार! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

गुरु राघवदास यांचे एकच स्वप्न आहे की, काहीही झाले तरी मंदिर बांधले जावे. त्यांचा शिष्य रघुनंदन दास थोडा आक्रमक स्वभावाचा आहे. पण, गुरु राघवदास समजावून सांगतात की, एक मार्ग बंद झाला तर हजारो मार्ग उघडतील. पण, सगळं काही शांततेने होईल. रघुनंदन दास आपल्या गुरूंना वचन देतात की, ते मंदिराच्या बांधकामासाठी ते आपले जीवन समर्पित करतील. १९४९ पासून ते ९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्यायालयाच्या निर्णयापर्यंतच्या सगळ्या घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश भारद्वाज आणि रजनीश बेरी यांनी केले आहे.

कसा आहे चित्रपट?

‘६९५’ चित्रपटाच्या एकंदरीत प्रभावाबद्दल बोलायचे तर, मध्यंतरापूर्वी चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते, पण मध्यंतरानंतर चित्रपटाची कथा थोडीशी विस्कळीत झाल्यासारखी वाटते. आदेशच्या अर्जुनने लिहिलेले जबरदस्त संवाद, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि संगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. गुरु राघव दास यांच्या भूमिकेत अरुण गोविल यांचा अभिनय चांगला झाला आहे. अशोक समर्थ यांनी रघुनंदन दास यांच्या भूमिकेत चांगली छाप सोडली आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मनोज जोशी यांनी वकिलाच्या पाच मिनिटांच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केला आहे. मुस्लिम तरुणाच्या भूमिकेत दयाशंकर पांडे आणि शैलेंद्र श्रीवास्तव आणि जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या भूमिकेत मुकेश तिवारी यांच्या भूमिका छोट्या असल्या, तरी वेगळा प्रभाव टाकतात.

विभाग