आपल्या घरी कोणताही प्राणी पाळणे हा एक वेगळा अनुभव असतो. अनेकांना आपल्या घरी आपला आवडता प्राणी हवा असतो. त्या प्राण्याला ते आपल्या घरातील एक सदस्य म्हणूनच घेऊन येत असतात. अनेकांच्या घरी पाळीव कुत्रा असल्याचे पाहायला मिळते. पण नवीन कुत्रा घरी पाळण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. आपल्या कुत्र्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत? काय करणे योग्य असते किंवा नवीन घरात आलेल्या कुत्र्याला सेट होण्यासाठी काय करावे असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया एखादा पाळीव कुत्रा घरी आणल्यावर कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात...
आपल्या नवीन पाळीव प्राण्यांना बदललेल्या वातावरणात स्थायिक होण्यास मदत करण्यासाठी काही गोष्टी करणे महत्त्वाचे असते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी कराव्यात...
वाचा: उन्हाळ्यात अक्रोड भिजवून खावेत की असेच खावेत? काय आहेत फायदे जाणून घ्या
पाळीव कुत्र्यांना घरात योग्य ती जागा द्या. जेथे त्यांना शांत विश्रांती करता येईल किंवा तेथे जाऊन ते झोपू शकतात.
पाळी कुत्र्याला घरी आल्यावर कोणतीही शिस्त लावताना ओरडू नका. त्याला प्रेमाने जवळ करा आणि योग्य तो मार्ग दाखवा. तसेच सुरुवातीला कुत्र्ये नव्या घरात शांत एका कोपऱ्यात बसतात. त्यांना तसेच हवा तेवढा वेळ बसू द्या.
वाचा: वेळीच सावध व्हा! ब्रेन ट्यूमरचे प्रमाण का वाढत आहे? काय आहे कारण वाचा
घरात नवा सदस्य आल्यामुळे तुम्ही उत्साही असता. पण घरी आणलेल्या पाळीव कुत्र्यासाठी सर्वकाही नवीन असते. तुम्ही सतत त्याच्या मागे राहाल तर तो चिडेल. जवळपास ७२ तास थांबणे गरजेचे आहे.
आपल्या पाळीव श्वानावर नव्या गोष्टी शिकण्यासाठी दबाव टाकू नका. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो हळूहळू गोष्टी शिकेल. पण तुम्ही लगेच त्याच्यावर दबाव टाकला तर तो घाबरेल.
वाचा: कडक उन्हातही हवी का रिफ्रेशिंग स्किन? अशा प्रकारे दिवसभर वापरा गुलाब जल
घरातील नव्या पाळीव कुत्र्याला सुरक्षित वाटेल असे वागा. सतत त्याला काही करण्यास सांगू नका किंवा शिकवण्यास जाऊ नका. हळूहळू त्याला तुमचा लळा लागेल, सुरक्षित वाटू लागेल त्यानंतर तो तुम्हाला अपेक्षित सर्व गोष्टी करु लागेल.
प्रत्येक नाते हे वेगळे असते. त्यामुळे जरी तुम्ही घरात पाळीव कुत्रा आणलात तरी त्याला निट सांभाळा. त्याला पहिल्याच दिवशी हव्या असलेल्या गोष्टी करु द्या. त्याला एखादी जागा आवडली तर तेथे बसू द्या. हळूहळू त्याला सगळ्या गोष्टींची सवय लावते.
संबंधित बातम्या