प्रत्येक विकेंडला सुट्टी असणाऱ्या सर्वांचे वेगवेगळे प्लान असतात. या आठवड्याच्या शेवटी बॉलिवूडमधील काही नुकताच प्रदर्शित झालेले सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या अनेक नव्या चित्रपटांपैकी एका चित्रपटासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जागा मिळू शकली नाही, तर काळजी करू नका ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहण्याची संधी मिळणार आहे. आता विकेंडला ओटीटीवर कोणते सिनेमे प्रदर्शित होणार हे चला जाणून घेऊया...
या यादीमधील पहिला सिनेमा आहे जिग्रा. परदेशात खोट्या तुरुंगात असलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी झटणाऱ्या सत्या या तरुणीवर आधारित 'जिगरा' या अॅक्शनपॅक्ड ड्रामामध्ये आलिया भट्ट झळकली आहे. वेदांग रैनाच्या फेस कार्डसोबत हा सिनेमा पाहणे उत्साह वाढवणारा आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ या चित्रपटात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. या विनोदी पण सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात त्यांच्या खासगी आयुष्याचे फुटेज असलेली सीडी हरवते त्यानंतर खरा ट्विस्ट येतो. राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट विनोद आणि ट्विस्टने भरलेला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
मेरी हा सिनेमा एका क्रूर गुन्ह्यानंतर आपल्या मुलीला न्याय मिळवून देणाऱ्या आईची कथा आहे. जेव्हा सरकारी यंत्रणा अपयशी ठरते तेव्हा ही आई स्वत:च्या हातात घेते. तन्वी मुंडले, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील आणि सागर देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा झी ५ वर प्रदर्शित होणार.
अमरन हा तामिळ, चरित्रपट भारतीय लष्कराचे मेजर मुकुंद वरदराजन यांची कहाणी सांगतो, त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे चित्रण करतो. शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
सिकंदर का मुकद्दर हा एक थरारक क्राइम ड्रामा आहे. या चित्रपटात एक दृढ निश्चयी पोलिस अधिकारी दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या टोळीला पकडतो. अविनाश तिवारी, जिमी शेरगिल आणि तमन्ना भाटिया अभिनीत हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
या आठवड्यात ओटीटीवर हे चर्चेत असलेले सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे विकेंडला तुम्ही हे सिनेमे घर बसल्या पाहू शकता.
संबंधित बातम्या