आज आम्ही तुम्हाला एका हॉलिवूड क्राइम थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट क्राइम थ्रिलर सायकॉलॉजिकल चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक सायको किलर दाखवण्यात आला आहे जो त्याच्या शिकारीची कातडी काढायचा. या आरोपीला कसे पकडले हे देखील या सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा कोणता आहे ओळखलत का? नाही ना... मग चला जाणून घेऊया...
या हॉलिवूड चित्रपटाचे नाव होते 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स'. या चित्रपटात जोडी फोस्टर क्लॅरिस स्टारलिंग नावाच्या तरुण एफबीआय एजंटची भूमिका साकारत आहे. जास्त वजन असलेल्या महिलांची शिकार करून त्यांची कातडी काढणाऱ्या सीरियल किलरला पकडण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
या चित्रपटाला पाच ऑस्कर मिळाले आहेत. या चित्रपटातील अँथनी हॉकिन्सचा अभिनय चांगलाच गाजला होता. हा चित्रपट १९९१ सालचा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यापैकी पाच पुरस्कार ऑस्कर होते. आयएमडीबीने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय अभिनेता अँथनी हॉकिन्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार, जोडी फोस्टरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि जोनाथन डेम ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लेखनाचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. आयएमडीबीच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाने सुमारे 71 विविध पुरस्कार जिंकले आहेत.
वाचा: चिप्सच्या दुकानात बसून घेतले अभिनयाचे धडे, अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी वाचून डोळ्यात येईल पाणी
द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्सच्या आयएमडीबी रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग 8.6 आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
संबंधित बातम्या