Fathers' Day : बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका कोणत्या? जाणून घ्या सिनेमांविषयी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fathers' Day : बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका कोणत्या? जाणून घ्या सिनेमांविषयी

Fathers' Day : बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका कोणत्या? जाणून घ्या सिनेमांविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 14, 2024 04:01 PM IST

Fathers' Day : १६ जून रोजी फादर्स डे साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट लिहित शुभेच्छा देताना दिसतात. चला जाणून घेऊया बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील गाजलेल्या वडीलांच्या भूमिकेविषयी…

Fathers' Day: बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका (YouTube)
Fathers' Day: बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका (YouTube)

प्रत्येकाच्या आयुष्यात वडील हे सुपरहिरो म्हणून रोल करत असतात. ते आपल्यावर प्रेम करतात, आपले संगोपन करतात, आपले रक्षण करतात आणि त्याहीपेक्षा आपल्या पंखांना बळ देतात. आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी ते जगाच्या शेवटापर्यंत जाण्याची ताकद वडील आपल्याला देत असतात. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे वडिलांवर आधारित होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. फादर्स डे निमित्ताने जाणून घेऊया या चित्रपटांविषयी आणि त्यामधील वडिलांची भूमिका साकारलेल्या कलाकारांविषयी…

१. मुघल-ए-आझममधील अकबर (१९६०)

http://www.hindustantimes.com/Images/popup/2015/6/Akbar-Mughal-E-Azam.jpg

के आसिफ यांच्या या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी अकबराची भूमिका साकारली होती. तर दिलीप कुमार हे सलीमच्या भूमिकेत दिसले. पण अकबरामुळे सलीमला अनारकलीला गमवावे लागले होते. या चित्रपटातील अकबर ही भूमिका प्रचंड गाजली होती.
वाचा: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल

२. डॅडी चित्रपटातील आनंद १९८९

महेश भट्ट यांच्या डॅडी या चित्रपटातील बाप आणि लेकीची जोडी तुफान गाजली होती. वडिलांची भूमिका ही अनुपम खेर यांनी साकरली होती. तर मुलीच्या भूमिकेत पूजा भट्ट दिसली होती. या चित्रपटाच मुलीच्या सुखासाठी तिचा बाप सर्वकाही त्याग करायला तयार होतो हे दाखवण्यात आले आहे.
वाचा: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात

३. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील चौधरी बलदेव सिंग (१९९५)

http://media.indiatimes.in/media/content/2014/Sep/ddlj%20kajol%20with%20dad_1409650718.gif

लंडनमध्ये वाढलेल्या आपल्या मुलीला पंजाबमध्ये शिफ्ट करायला भाग पाडणाऱ्या वडिलांची कथा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटात दाखवण्यात आली ईहे. 'जा सिमरन जी ले अपनी जिंदगी' म्हणणाऱ्याला, अमरीश पुरीची ही व्यक्तिरेखा विशेष गाजली होती.

४. अकेले हम अकेले तुम मधील राहुल (१९९५)

http://www.hindustantimes.com/Images/popup/2015/6/AamirK.jpg

मनीषा कोयरालाने पती आमिर खानला सोडल्यानंतर मुलांसोबतचे त्याचे नाते कसे खुलत जाते. तसेच त्याच्या आयुष्याच उभा राहिलेला संघर्ष हा प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत होता. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता.
वाचा: काजोलला चांदेकरांनी काढले घराबाहेर, काय असेल कलाचे पाऊल? वाचा 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये काय होणार

५. पिकू चित्रपटातील भाष्कोर


http://www.hindustantimes.com/images/2014/11/87cdac6f-64b1-4c41-8632-f63dfc3b044awallpaper1.jpg

सूजित सरकारच्या पिकू या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकरलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. म्हातारपणात वडीलांचे लहानमुलासारखे वागणे मुलगी कशा प्रकारे सांभाळते हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता.

Whats_app_banner