Shaktimaan : ४०० एपिसोड, शोही तुफान गाजला! मग अचानक का बंद झाला होता ‘शक्तिमान’? मुकेश खन्ना म्हणाले...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shaktimaan : ४०० एपिसोड, शोही तुफान गाजला! मग अचानक का बंद झाला होता ‘शक्तिमान’? मुकेश खन्ना म्हणाले...

Shaktimaan : ४०० एपिसोड, शोही तुफान गाजला! मग अचानक का बंद झाला होता ‘शक्तिमान’? मुकेश खन्ना म्हणाले...

Nov 13, 2024 04:47 PM IST

Shaktimaan Mukesh Khanna :मुकेश खन्ना स्टारर शो'शक्तिमान'दूरदर्शनवरील लोकप्रियतेच्या बाबतीतही खूप पुढे होता. पण हा भारतीय सुपरहिरो शो अचानक १९ वर्षांपूर्वी का बंद पडला?

mukesh khanna Shaktimaan
mukesh khanna Shaktimaan

Shaktimaan Mukesh Khanna : अभिनेते मुकेश खन्ना यांचा सुपरहिरो शो ‘शक्तिमान’ ९०च्या दशकात खूप लोकप्रिय झाला होता. छोट्या पडद्याचा एक कल्ट शो म्हणून आजही तो सगळ्यांच्या लक्षात आहे. नुकतेच ‘शक्तिमान’ने पुन्हा एकदा पडद्यावर परतायचे असे ठरवले आहे. यावेळी ‘शक्तिमान’ पूर्णपणे वेगळ्या आणि नवीन शैलीत दिसत आहे. यामुळे, ‘शक्तिमान रिटर्न’ हे शोचे नाव चर्चेत आले आहे. मात्र, आता सगळ्यांना जुन्या ‘शक्तिमान’विषयी जाणून घ्यायचे आहे. ‘शक्तिमान’ हा शो खूप गाजला होता. टीव्हीवर धुमाकूळ घालत असताना देखील ‘शक्तिमान’ हा शो बंद का करण्यात आला? असा प्रश्न देखील सगळ्यांना पडला आहे.

शक्तिमान शो बंद का झाला?

भारतीय सुपरहिरो शो म्हणून ‘शक्तिमान’ने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मालिका आवडली होती. दिग्दर्शक दिनकर जानी आणि निर्माते मुकेश खन्ना यांनी ९०च्या दशकात चाहत्यांना मनोरंजनाचे एक उत्तम माध्यम दिले, ते आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. 

आता शक्तिमानने पुनरागमन केल्यानंतर, हा शो १९ वर्षांपूर्वी का बंद पडला याचे कारणही चर्चेत आले आहे. मुकेश खन्ना यांनी २०१३मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर उघडपणे भाष्य केले होते. ते म्हणाले की, ‘आमचा शो खूप लोकप्रिय झाला. महाभारतातील भीष्म पितामह या व्यक्तिरेखेची प्रतिमा मोडीत काढण्यासाठी मी शक्तिमानची योजना आखली होती आणि त्यात मी बऱ्याच अंशी यशस्वी झालो. पण, नंतर आमचे बजेट वाढू लागले आणि गोष्टी बिघडू लागल्या. आर्थिक अडचणींमुळे इच्छा असूनही आम्ही शक्तिमानला पुढे नेऊ शकलो नाही. या कारणास्तव, प्रचंड यश मिळत असूनही, आम्हाला तो शो बंद करावा लागला.’

तुमचा, आमचा आणि सगळ्यांचा लाडका ‘शक्तिमान’ परत येतोय! प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

मुकेश खन्ना यांनी २००५मध्ये देखील एक मुलाखत दिली होती, त्यातही शक्तिमान बंद होण्यामागचे कारण आर्थिक समस्या असल्याचे म्हटले होते. मात्र, आता ही मालिका यूट्यूबवर परतली आहे. 

‘शक्तिमान’ने गाजवलं ९०चं दशक!

शक्तिमान’ हा शो १९९७ मध्ये सुरू झाला होता आणि २०२५पर्यंत तो दूरदर्शनवर प्रसारित झाला. या काळात, ४०० भागांद्वारे, या काल्पनिक शोने सर्वांचे भरपूर मनोरंजन केले आणि मनोरंजन विश्वात यशस्वी मालिका म्हणून आपला ठसा उमटवला. या शोमध्ये मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ नावाच्या सुपरहिरोची भूमिका साकारली होती. कॉमन लाईफ जगणारी व्यक्ती सुपरहिरो कशी असते, हे या शोमध्ये दाखवण्यात आलं होतं. सामान्य जीवनात मुकेश खन्ना यांच्या व्यक्तिरेखेचे नाव गंगाधर होते. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटी शक्तिमान मुलांना एक अनमोल धडा द्यायचा.

Whats_app_banner