Nitin Kumar Satyapal Suicide: टीव्ही अभिनेता नितीन कुमार सत्यपाल याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. ज्यामुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच टीव्ही अभिनेता नितीन चौहान त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता आणि आता नितीन कुमार सत्यपाल यांच्या मृत्यूने मनोरंजनसृष्टीत खळबळ माजली आहे. अवघ्या ३५ वर्षीय अभिनेत्याने यशोधाम परिसरात असलेल्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
'आज तक'च्या वृत्तानुसार, पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नितीन कुमार सत्यपाल डिप्रेशनमध्ये होता. अनेक वर्षांपासून तो नैराश्यासाठी औषधे घेत होता. काम मिळत नसल्याने तो दु:खी होता. अनेक वर्षांपासून नितीन कुमार यांना ना चित्रपटात काम मिळत होते ना टीव्ही मालिकांमध्ये. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली होती.
नितीन कुमार सत्यपाल यांच्या पत्नीने सांगितले की, ती आपल्या मुलीसोबत पार्कमध्ये गेली होती. पण घरी परतल्यावर दरवाजा आतून बंद होता. पत्नीने वारंवार दरवाजा ठोठावला, पण उत्तर मिळाले नाही. अशा स्थितीत पत्नीने आरडाओरड केली. आणि त्यांनंतर आपल्या पटीने आत्महत्या केल्याचे त्यांना आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून नितीन कुमार सत्यपाल नैराश्यात होता. यातून सावरण्यासाठी तो थेरपी आणि औषधेही घेत होता. मात्र त्याला या मानसिक स्थितीतून बाहेर पडण्यास यश मिळाले नाही. अखेर नितीन कुमार सत्यपाल याने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
वास्तविक ही घटना बुधवारी घडली आहे. मात्र पोलिसांनी शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली आहे. याबाबत बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, नितीन कुमार सत्यपाल सिंह असे या अभिनेत्याचे नाव आहे. टीव्ही अभिनेता बुधवारी मुंबईतील यशोधम परिसरातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, नितीन सिंग यांना गेल्या काही वर्षांपासून टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्याने ते नैराश्यात गेले होते. या आजारासाठी त्याच्यावर उपचारही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी नितीनची पत्नी त्यांच्या मुलीला घेऊन एका उद्यानात गेली होती. यावेळी नितीन घरी एकटाच होता. पत्नी आणि मुलगी घरी परत आल्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा आतून बंद दिसला. आणि त्याचवेळी त्यांना नितीनडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पत्नीने आरडाओरड केली. नंतर अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या ४ दिवसांत दोन तरुण अभिनेत्यांच्या मृत्यूने टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.