मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  3 Idiots: 'महाराष्ट्र शाहीर'च्या यशानंतर 'थ्री ईडियट्स'मधील मिलीमीटर दिसणार या चित्रपटात

3 Idiots: 'महाराष्ट्र शाहीर'च्या यशानंतर 'थ्री ईडियट्स'मधील मिलीमीटर दिसणार या चित्रपटात

Aarti Vilas Borade HT Marathi
May 20, 2023 09:14 AM IST

Dushant Wagh: अभिनेता दुष्यंत वाघने 'थ्री ईडियट्स' या चित्रपटात मिलिमीटरची भूमिका साकारली होती. तो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात दिसला होता. आता त्याचा आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dushant Wagh
Dushant Wagh

“मिलीमीटर अब सेंटीमीटर जो बन गया है” हा जगप्रसिद्ध संवाद तुम्हाला आठवत असेलच, अर्थात हा सिनेमा होता,“थ्री ईडियट”. या सिनेमात मिलीमीटरच्या भूमिकेतला मराठमोळा अभिनेता दुष्यंत वाघ आता मराठी सिनेमात लक्ष्यवेधी भूमिकांमध्ये दिसून येतो आहे. “धर्मवीर” सिनेमा पाठोपाठ “महाराष्ट्र शाहीर” सिनेमातील बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेला दुष्यंत वाघ लवकरच “शिष्यवृत्ती” या मराठी सिनेमातून मध्यवर्ती भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

अखिल देसाई लिखित आणि दिग्दर्शित शिष्यवृत्ती या सिनेमात दुष्यंत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल दुष्यंत सांगतो कि, मध्यवर्ती भूमिका असलेला हा माझा पहिलाच चित्रपट असणार आहे. अखिल देसाई यांनी मला जेव्हा या सिनेमाची गोष्ट ऐकवली होती, तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला होता. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं म्हणत असतांना, मिळालेली शिष्यवृत्ती नाकारून स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर पुढे जाणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. आशय मला आवडल्यानेच चित्रपटाला मी होकार दिला. शिवाय यात मला यात मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळणार होती.

दुष्यंत पुढे सांगतो की, नशिबाने आजवर मी केलेल्या भूमिकांमध्ये मला गेटअप साठी जास्त महत्व द्यावे लागले होते. थ्री ईडियट मध्ये मी नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला तरुण होतो, धर्मवीर मध्ये दिघे साहेबांच्या तरुण काळातला मित्र होतो, तर महाराष्ट्र शाहिर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तरुणपणातील भूमिका होती. आता शिष्यवृत्ती सिनेमात मी जबाबदार शिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे, यासाठी देखील माझा वेगळा गेटअप आहे. लवकरच तो तुमच्यासमोर येणार आहेच. जून महिन्यात शिष्यवृत्ती सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात माझ्या सोबत कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस, अंशूमन विचारे या कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका असून रुद्र ढोरे प्रमुख बालकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग