बॉलिवूडचा दबंग खान सलमान जगभरात प्रसिद्ध आहे. त्याला भेटण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. नुकताच सलमानची एक चाहती दिल्लीवरुन पनवेलला पोहोचली आहे. या वर्षीय चाहतीला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर ही चाहती आहे तरी कोण? असा प्रश्न पडला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगरच्या गुंडानी तेथे रेकी करून सलमानवर हल्ल्याचा कट आखला होता. त्यामुळे पनवेलच्या फार्म हाऊसवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
एक २४ वर्षीय तरुणी दिल्लीहून सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसवर पोहोचली आहे. त्या तरूणीच्या सांगण्यानुसार, ती सलमानची मोठी चाहती आहे. सलमानशी लग्न करायचं आहे असं सांगत ती चरूणी फार्महाऊसवर पोहोचली. त्याची भेट घेण्याचा हट्ट करू लागली. मात्र आसपासच्या लोकांनी तिचा हा गोंधळ फोनमध्ये रेकॉर्ड केला आणि लागलीच या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी यावर अॅक्शन घेतली.
वाचा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंगमधील पहिला व्हिडीओ आला समोर, 'बॅकस्ट्रीट बॉईज'चा धम्माल परफॉर्मन्स
जेव्हा या २४ वर्षीय तरुणीने गोंधळ घातला तेव्हा सलमान खान फार्महाऊसवर होता की नाही? असा प्रश्न पडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खान त्यावेळी पनवेलच्या फार्म हाऊसवर नव्हता. तो मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असल्याचे म्हटले जाते.
वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्याने शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला दिला धक्का, Viral Videoने वेधले सर्वांचे लक्ष
घटनेचा व्हिडीओ पाहाता तरुणी सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. तिला स्थानिक पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण तरुणी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. शेवटी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यू पनवेलमध्ये काऊन्सिलिंगसाठी एका एनजीओमध्ये पाठवण्यात आले. एनजीओच्या संस्थापकांच्या माहितीनुसार, तरुणीची मानिसिक स्थिती गंभीर आहे. ती सलमान खानच्या पडद्यावरील प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. तिला मानसिक उपचारांसाठी कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात गदाखल करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. उपचारांनंतर तिला घरी पाठवण्यात येईल.
वाचा: मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"चा ट्रेलर प्रदर्शित