मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये घुसणाऱ्या ‘त्या’ तरुणांना पोलिसांकडून अटक!

Shah Rukh Khan: ‘शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये घुसणाऱ्या ‘त्या’ तरुणांना पोलिसांकडून अटक!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 04, 2023 08:45 AM IST

Shah Rukh Khan House Mannat: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण २०-२१ वर्षांचे असून, मन्नतमध्ये घुसखोरी करताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले होते.

Shah Rukh Khan House Mannat
Shah Rukh Khan House Mannat

Shah Rukh Khan House Mannat: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लोकप्रियता इतकी आहे की, त्याची एक झलक मिळवण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जातात. काहीच दिवसांपूर्वी अशीच एक घटना शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये घडली होती. दोन तरुणांनी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत ‘मन्नत’मध्ये घुसखोरी केली होती. ‘मन्नत’ बंगल्याच्या भिंतीवरून उडी मारून या तरुणांनी शाहरुख खानच्या बंगल्यात प्रवेश केला होता. मात्र, हे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर आता पोलिसांनी या तरुणांना अटक केली आहे.

गुरुवारी (२ मार्च) ही घटना घडली असून, शुक्रवारी या दोन्ही तरुणांची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे. शाहरुख खानच्या बंगल्यात शिरणारे हे दोन्ही तरुण गुजरातचे असून, ते स्वतःला शाहरुख खानचे चाहते म्हणत आहेत. मात्र, पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूंनी तपासणी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण २०-२१ वर्षांचे असून, मन्नतमध्ये घुसखोरी करताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले होते. शाहरुख खान याच्या स्टाफने या तरुणांना भिंतीवरून येताना पाहिले होते.’

पकडले गेल्यानंतर शाहरुखच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची कसून चौकशी केली. यानंतर सिक्युरिटी टीमने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या टीमने या तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांवर एफआयआर दाख करण्यापूर्वी पोलिसांनी देखील त्यांची कसून चौकशी केली. आता या दोन्ही तरुणांना पोलीस कोठडीत टाकण्यात आले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार हे दोन्ही तरुण शाहरुख खानचे मोठे चाहते असून, आपल्या आवडत्या अभिनेत्याला जवळून बघण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. आतापर्यंतच्या चौकशीत त्यांचा इतरही काही वाईट हेतू होता, असे आढळून आलेले नाही. या तरुणांच्या कुटुंबाशी संपर्क करण्यासाठी त्यांचे नंबर घेण्यात आले आहेत. यात आता गुजरात पोलीस देखील तपास करणार असून, या तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या जबाबांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

IPL_Entry_Point