बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा १९९४मध्ये फॅमिली ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट १९८२ मध्ये याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक होता. दोन्ही चित्रपटांमध्ये फरक एवढाच होता की १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा एका खेड्यातील कुटुंबावर दाखविण्यात आली होती. तर 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा एका शहरी कुटुंबावर आधारित होती. चित्रपटाची कथा पूर्णपणे सारखीच होती. ओळखत का हा सिनेमा कोणता?
या सिनेमाचं नाव ओळखलंस का?नसेल तर सांगतो. या चित्रपटाचं नाव होतं हम आपके हैं कौन! त्यावेळी प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहणे आजही लोकांना आवडते. त्या वर्षी आलेल्या या चित्रपटातील गाणीही खूप गाजली होती. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्याव्यतिरिक्त रेणुका सहाणे, मोनीश बहल, अनुपम खेर, रीमा लागू आणि आलोक नाथ यांच्याही भूमिका होत्या.
सलमान खान आणि माधुरीच्या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे बजेट ६ कोटी रुपये होते. तर हॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १११.६३ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता.
'हम आपके हैं कौन' हा १९८२ साली आलेल्या 'नादिया के पार' या चित्रपटाचा रिमेक होता. हम आपके हैं कौन आणि नादिया के पार हे दोन्ही चित्रपट राजश्री बॅनरखाली बनले. 'नादिया के पार' या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद मूनीस यांनी केले होते. या चित्रपटात साधना सिंह, सचिन पिळगावकर, लीला मिश्रा, इंद्रा ठाकूर, लीला मिश्रा या कलाकारांनी काम केले होते.
वाचा: सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से
'हम आपके हैं कौन'चे आयएमडीबी रेटिंग ७.५ आणि नादिया के परचे आयएमडीबी रेटिंग ८.१ आहे. 'हम आपके हैं कौन' पाहायचे असेल तर नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तर प्राइम व्हिडिओवर तुम्ही नादिया के पार पाहू शकता.
संबंधित बातम्या