बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक सिनेमे आजपर्यंत प्रदर्शित झाले आहेत. यातील अनेक चित्रपटांची कथा वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते. आज आम्ही तुम्हाला सलमान खान आणि संजय दत्त यांच्या अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. संजय दत्त आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट संजय दत्तच्या आधी आमिर खानला ऑफर करण्यात आला होता.
सलमान आणि संजयच्या सिनेमाचं नाव ओळखलंत का? नाही ना. चला जाणून घेऊया.. साजन असे या चित्रपटाचे नाव होते. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला साजन हा चित्रपट त्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. sacnilk.com दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाचं नेट कलेक्शन ९.५० कोटी होतं. तर या चित्रपटाने जगभरात १८ कोटी रुपयांची कमाई केली होती.
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात सलमान खानसोबत आमिर खानला कास्ट केले जाणार होते, परंतु आमिर खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला. आमीर खानला ऑफर करण्यात आलेली भूमिका ही तितकी इंटरेस्टिंग वाटली नाही. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार नाही असं त्याला वाटत होतं. याच कारणामुळे आमीर खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. यानंतर हा चित्रपट संजय दत्तला ऑफर करण्यात आला होता. पण संजय दत्तची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडून गेली.
वाचा: राष्ट्रपतींसमोरच अभिनेत्याने मोडला नियम, राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना केली 'ही' विनंती
सलमान खान आणि संजय दत्त यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लॉरेन्स डिसूझा यांनी केले होते. या चित्रपटात सलमान आकाश वर्माची तर संजय दत्त सागरची भूमिका साकारत आहे. माधुरी दीक्षितचे खरे नाव पूजा आहे. सलमान खानच्या आई-वडिलांनी लहानपणी संजय दत्तला दत्तक घेतले होते. सलमान खान आणि संजय दत्त हे भाऊंपेक्षा जास्त राहतात. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.२ आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
संबंधित बातम्या