वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 21, 2024 07:21 PM IST

Waheeda Rahman: अभिनेत्री वहिदा रहमान या त्यांच्या काळातील सर्वोत्कृ्ष्ट बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण तुम्हाला त्यांच्या पहिल्या सिनेमाचे नाव आठवते का? या सिनेमाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती.

Waheeda Rahman
Waheeda Rahman

Waheeda Rahman : बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये वहिदा रहमान यांचे नाव घेतले जाते. त्या त्यांच्या काळातील सर्वोत्कृ्ष्ट बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या काळातील उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले. पण वहिदा रेहमान यांच्या बॉलिवूड डेब्यू सिनेमाचे नाव तुम्हाला माहित आहे का? वहिदा रहमान यांनी १९५६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. वहिदा रहमान यांचा हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात देव आनंद आणि वहिदा रहमान यांच्याही भूमिका होत्या.

वहिदा रहमानचा पहिला चित्रपट कोणता होता?

तुम्ही चित्रपटाचे नाव ओळखले का? नसेल तर चला जाणून घेऊया. . 'सीआयडी' असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटाची निर्मिती गुरुदत्त यांनी केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केले होते. चित्रपटातील गाणीही खूप गाजली होती. या चित्रपटातील ये है बॉम्बे मेरी जान, कहीं पे निगाझिं कहीं पर निशाना, लेके पहला पहला प्यार आणि आँखों ही आंख में लक्ष्य हो गया ही गाणी तुफान हिट ठरली होती.

त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार सीआयडी हा चित्रपट १९५६ मध्ये सुपरहिट ठरला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार , सीआयडी चित्रपटाचे बजेट हे केवळ ५० लाख रुपये होते. पण हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याने चित्रपटगृहामध्ये धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बजेटच्या चार पट कमाई केली होती. म्हणजेच सिनेमाने दोन कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?

सीआयडी चित्रपटाचे कथानक काय होते?

वहिदा रहमानच्या चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले तर एका वृत्तपत्राच्या संपादकाची हत्या करण्यात आली आहे. एका श्रीमंत व्यक्तीचा अंडरवर्ल्डशी असलेला संबंध संपादक उघड करणार असतो. त्यानंतर या खुनाचे प्रकरण सोडविण्यासाठी सीआयडी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. देवा आनंदने या चित्रपटात इन्स्पेक्टर शेखरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात देवा आनंद , जॉनी वॉकर , कुमकुम , तुन तुन आणि जगदीश राज यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.१ आहे. हा चित्रपट पाहायचा असेल तर प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.

Whats_app_banner