मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  12th Fail Collection: ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालतोय विक्रांत मेस्सीचा चित्रपट!

12th Fail Collection: ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालतोय विक्रांत मेस्सीचा चित्रपट!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 05, 2024 02:31 PM IST

12th Fail Box Office Collection: विक्रांत मेस्सीचा ‘12th Fail’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून देखील, लोक अजूनही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत.

12th Fail Box Office Collection
12th Fail Box Office Collection

12th Fail Box Office Collection:छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या विक्रांत मेस्सी याने आता मोठा पडदा देखील गाजवायला सुरुवात केली आहे. त्याचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्याचा ‘12th Fail’ हा चित्रपट अजूनही चित्रपटगृह गाजवत आहे. या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. अभिनेता विक्रांत मेस्सीचा ‘12th Fail’हा चि12th Fail Box Office Collectionत्रपट २०२३मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल १०० दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट आपले स्थान टिकवून राहिला आहे. अजूनही हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

विक्रांत मेस्सीचा ‘12th Fail’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला असून देखील, लोक अजूनही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत. या चित्रपटाच्या कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत.‘12th fail’हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले असून, ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट अवघे २० कोटी रुपये होते. एवढ्या कमी बजेटमध्ये बनवलेला चित्रपट अजूनही थिएटरमधून हटलेला नाही. आता या चित्रपटाला ओटीटी रिलीजचा फायदा देखील मिळत आहे. तर, चित्रपटगृहात देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने ओटीटीवर रिलीज झाल्यापासून २.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Viral Video: बॉलिवूड अभिनेत्रींनंतर आता अक्षय कुमार देखील झाला डीपफेकचा शिकार; व्हायरल होतोय व्हिडीओ!

कलाकरांनाही मिळाली प्रसिद्धी

विक्रांत मेस्सीचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आवडली आहे. यातील कलाकारांच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. दोघांमधील केमिस्ट्रीला चाहत्यांनी भरभरून दाद दिली. याशिवाय या चित्रपटाद्वारे मेधा शंकरही रातोरात स्टार बनली आहे. विशेषत: हा चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर लोकांमध्ये त्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘12th Fail’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर आधारित आहे. दोघांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांची प्रेमकथा यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. हा चित्रपट डिसेंबरच्या अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. नेटफ्लिक्सवरही या चित्रपटाला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

WhatsApp channel