मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  1 Numbercha Dha: शाळा न आवडणाऱ्या मुलाची गोष्ट; '१ नंबरचा ढ' चित्रपट जल्लोषात प्रदर्शित!

1 Numbercha Dha: शाळा न आवडणाऱ्या मुलाची गोष्ट; '१ नंबरचा ढ' चित्रपट जल्लोषात प्रदर्शित!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 03, 2024 12:17 PM IST

1 Numbercha Dha Marathi Movie: '१ नंबरचा ढ' हा चित्रपट शालेय जीवनावर आधारित असून, यात एक धमाल कथानक पाहायला मिळणार आहे.

1 Numbercha Dha Marathi Movie
1 Numbercha Dha Marathi Movie

1 Numbercha Dha Marathi Movie: अभ्यासात मागे पडलेल्या आणि वाचता, लिहिता किंवा काही जमले नाही म्हणून 'ढ' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मनीष नावाच्या एका मुलावर आधारित '१ नंबरचा ढ' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच या चित्रपटाचं कथानक देखील हटके असणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. या चित्रपटातून एका अशा सामान्य मुलाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याला बघून प्रत्येकालाच आपल्या बालपणाची आठवण येईल.

'१ नंबरचा ढ' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. '१ नंबरचा ढ' हा चित्रपट शालेय जीवनावर आधारित असून, यात एक धमाल कथानक पाहायला मिळणार आहे. शाळा ही काहींना आवडते, तर काहींना आवडत नाही. यातील शाळा न आवडणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. त्याला शाळा आवडत नाही, म्हणून त्याच्यावर घरचे सतत दबाव थकत राहतात. कुटुंबाचा दबाव सहन न झाल्याने, हा मुलगा थेट शाळा सोडून पळून जातो. त्यानंतर काय घडतं, तो कशा पद्धतीने घरी येतो, याचे चित्रीकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Carl Weathers Passes Away: प्रसिद्ध अभिनेते कार्ल वेदर्स यांचे निधन; ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जळगाव जिल्ह्यातच शूटिंग

'१ नंबरचा ढ' या चित्रपटाची शूटिंग जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिर्डी, पाल, सावदा, फैजपूर आदी भागात करण्यात आली आहे. कमलेश सावंत, प्राची नील, लीना भुतकर, शर्व कुलकर्णी या कलाकारांनी ‘१ नंबरचा ढ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मनीष याची भूमिका शर्व कुलकर्णी, महादेव अर्थात मनीषच्या वडिलांची भूमिका कमलेश सावंत, सुरेखा अर्थात आईची भूमिका प्राची नील यांनी, तर अजीची भूमिका विना भूतकर यांनी साकारली आहे. या चित्रपटात स्थानिक कलाकारांना देखील संधी देण्यात आली असून, यात किरण अडकमोल, हर्षल पाटील, विशाल जाधव, जगदीश नेवे, मोरेश्वर सोनार, आरती गोळीवाले, सपना बाविस्कर, नुपूर पांडे, अनिल कोष्टी तर बाल कलाकारांमध्ये दिग्विजय जगदाळ, पराग चौधरी, सिद्धार्थ पाटील, उत्कर्ष नेमाडे, कृष्णा चौधरी, अभिजित पाटील, आरुष रायसिंग आदींचा समावेश असल्याचे दिग्दर्शक प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.

निर्मात्यांनी चित्रपट बनवताना आपल्या मातीशी असणारं नातं जोडून ठेवलं. या चित्रपटाची सुरुवात जळगावपासून केली आहे. '१ नंबरचा ढ' हा शब्द जो वापरला जातो, या 'ढ' शब्दापासून काहीतरी चांगला बोध समाजाला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कोणाला कमी न लेखता प्रत्येकामध्ये काही तरी गुण असतात आणि हेच गुण त्यांनी चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

WhatsApp channel

विभाग