Why BJP didn't nominate all three sitting MPs in Mumbai : भाजपने मुंबईतील तीन विद्यमान खासदार, पुनम महाजन, गोपाल शेट्टी, मजोज कोटक या विद्यमान खासदारांना डावलून त्यांच्या जागी नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. या तिघांनाही उमेदवारी न देण्यामागचे मोठे कारण पुढे आले आहे. जनतेशी असलेला अपुरा संपर्क तसेच अयोग्य वर्तन, तसेच भराष्ट्राचार संबंधित प्रकरणांमुळे या उमेदवारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपने उमेदवारी देण्यापूर्वी मतदार संघात केलेल्या सर्वेक्षणावरून ही पाऊल उचलले आहे. या सर्वेक्षणात तिघांबद्दल नकारात्मक वातावरण असल्याचे देखील पुढे आले आहे.
भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकसाठी उमेदवारी देतांना अत्यंत कठोर नियम लागू केले होते. ज्यांचे वर्तन जनतेशी चुकीचे आहे तसेच त्यांचा जनसंपर्क नाही, त्यांचे वर्तन अयोग्य असेल किंवा लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहार या सारखी काही प्रकरणे पुढे आल्यास त्या खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला होता. या बाबत गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. याचा पहिला अहवाल हा गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आला. या अहवालात पुढे आलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे भाजपचे प्रभारी शिवप्रकाश यांनी राज्यातील काही खासदाराशी चर्चा केली. त्यानुसार ज्या खासदारांच्या कामगिरीबद्दल सर्वेक्षणाचे अहवाल नकारात्मक आला किंवा काहींबद्दल सामान्य नागरिकांणी तक्रारी केल्या होत्या अशा खासदारांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तंबी दिली होती. तसेच त्यांचे वर्तन सुधारण्यास त्यांना काही महिन्यांचा कालावधी देखील देण्यात आला होता.
दरम्यान, भाजपने याच सर्वेक्षणावर लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली. यात राज्यातील मुंबई नॉर्थ सेंट्रल येथून पुनम महाजन, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी व ईशान्य मुंबईतून मनोज कोटक या विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या ऐवजी जेष्ठ वकील उज्ज्वल निकम, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि आमदार मिहीर कोटे यांना भाजपने संधि दिली.
पूनम महाजन यांचा जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क नव्हता. तसेच त्यांचे वर्तन हे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्याशी उद्धटपणे होते त्या उपलब्ध होत नाहीत तसेच फोन उचलत नाहीत अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्या प्रदेश पातळीवरील बैठका व कार्यक्रमांमध्येही गैरहजर राहात असल्याने त्यांचे हे वर्तन त्यांना भोंवले. त्यांच्या या वर्तणूकीमुळे त्यांना यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली.
तर मनोज कोटक यांच्या बाबत आर्थिक गैर व्यवहार, व्यावसायिकांशी संबंध, कार्यकर्त्यांशी वर्तनाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तर त्यांचा जनसंपर्क नसल्याच्या तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. या मुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तर गोपाल शेट्टी यांच्याबाबतही याच प्रकारे सामान्य नागरिकांच्या तक्रारी होत्या. नागरिक त्यांचे विविध प्रश्न शेट्टी यांच्या कडे घेऊन जात होते. शेट्टी हे त्यांना मदत करत असले तरी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते नीट बोलत नसल्याच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समजते.
या तीनही खासदार यांच्या बाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता किती आहे, याबाबत या सर्वेक्षणात आढावा घेतला गेला होता. शेट्टी हे गेल्या निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते. या वर्षीही ते निवडून येण्यात फारशी अडत्तण नव्हती. मात्र, गोयल यांना सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी शेट्टी यांना उमेदवारी नाकारली गेली. तर मनोज कोटक यांना २०१९ च्या लोकभेत लॉटरी लागली होती. तर महाजन यांना पक्षांतर्गत विरोधाचा फटका बसला आहे अशी देखील चर्चा आहे.
संबंधित बातम्या