मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

May 18, 2024 01:30 PM IST

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आरएसएसवरून केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सारकरव टीका केली.
इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सारकरव टीका केली.

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज मुंबई येथे सभा पार पडली. या सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला देखील उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. नकली शिवसेना या टीकेला उत्तर देतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

J P Nadda On Rss : भाजप आता सक्षम, आरएसएसची गरज नाही! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मोठा दावा

इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज मुंबईत पार पडली. यावेळी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, देशात सध्या तोडा फोडा राज्य करा असा सपाटा मोदी सरकारने चालू ठेवला आहे. आमच्यावर पाकिस्तानचे झेंडे नाचवल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आजही आठवत असेल. मनी वसे ते स्वप्नी दिसे अशा पद्धतीने त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असल्याने या निवडणुकीत मोदी पाकिस्तानचा मुद्दा बाहेर काढत आहेत. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. ते उद्या उठून आरएसएसला सुद्धा नकली बोलतील. ऐवढेच काय तर आरएसएसवर बंदी सुद्धा आणायला भाजप मागे पुढे पाहणार नाही. आरएसएसला पुढील वर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहे. पण भाजमुळे त्यांच्यासाठी हे धोक्याच वर्ष ठरणार असे चिन्हे आता दिसू लागले आहे.

Weather Updates: कुठे उष्णता आणि कुठे पावसाचा इशारा? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

उद्धव ठाकरे म्हणाले, जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत. नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला. त्याच संघाला हे नष्ट करायला निघाले आहेत.

राम मंदिराचे काम आम्ही पूर्ण करू

आमच्या शिवसेनेला हे नकली शिवसेना म्हणतात. मला नकली संतान म्हणणात. माझ्या दृष्टीने ही बेअकली लोक आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही राम मंदिरावर बुलडोजर चालवणार नाही तर आम्ही त्यांनी जे अर्धवट काम केले ते राम मंदिराचे पूर्ण करू. महाराष्ट्रला हे बदनाम करत असून मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन जायचा यांचा डाव आहे. मात्र, त्यांना आम्ही असे करू देणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्रचे वैभव आम्ही परत आणू.

WhatsApp channel