मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uddhav Thackeray : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, उद्धव ठाकरेंचा भरपावसात हल्लाबोल

Uddhav Thackeray : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, उद्धव ठाकरेंचा भरपावसात हल्लाबोल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 16, 2024 08:34 PM IST

Uddhav Thackeray On Modi : तुम्ही महाराष्ट्रात २५ च्या वर सभा घेतल्या उद्याही मुंबईत सभा घेणार आहात, परवाही घ्या मात्र पंतप्रधान म्हणून मुंबईतील ही तुमची शेवटचीच सभा असेल. ४ जून नंतर तुम्ही पंतप्रधान नसाल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.

उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Uddhav Thackeray On Narendra Modi : उद्धव ठाकरें यांनी आज डोंबिवलीत प्रचारसभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वाराणशीत मोदींना जिरेटोप घातला होता. यावरून ठाकरेंनी पटेलांना जोरदार टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले की, पटेलांनी अचानक महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर ठेवला. म्हणजे देणाऱ्यालाही डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही.

ट्रेंडिंग न्यूज

तुम्ही आमच्या महाराजांशी बरोबरी करता, घरी कोणी कुणाची पूजा करायची असेल तर खुशाल करा. पण, महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. प्रफुल्ल पटेल तुम्हाला महाराष्ट्र यावेळी नक्की आपटेल. मागे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातही कोणी सागरगोट्याने मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती. यापुढे असले उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत.

पंतप्रधान म्हणून मोदींच्या मुंबईत शेवटची सभा–

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dombivli rally) म्हणाले की, मोदी महाराष्ट्रात सभांवर सभा घेत आहेत. उद्याही त्यांची मुंबईत सभा आहे. परवाही घेतील. मात्र पंतप्रधान म्हणून त्यांची मुंबई व महाराष्ट्रातील ही शेवटचीच सभा असेल. ४ जून नंतर तुम्ही नरेंद्र मोदी तर असाल पण पंतप्रधान नसाल. देशात डीमोदीनेशन होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील. टरबुजाचा भाव आणखी खाली येईल. आत्ताही त्याला काही भाव नाहीत. असा टोला त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता लगावला.

मोदींना आता आरामाची गरज -

मोदींच्या नकली शिवसेना, नकली संतान टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सुद्धा माणूस आहेत. गेली १० वर्षे झोपले नसल्याने त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. त्यांचा मेंदू क्षीण झाला आहे. भाजपने त्यांच्यावर दया दाखवून त्यांना आराम द्यावा.

 

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांच्या पंतप्रधानपदासाठी मी सही केली होती, शिंदेंनी नाही हे मोदी विसरलेत. मोदी एकदा म्हणतात की उद्धव ठाकरेंना मदत करायला कधीही धावून जाईन. दुसऱ्या दिवशी म्हणातात नकली संतान. त्यामुळे उद्या तुम्हालाही पाकिस्तानचे मतदार समजतील.

WhatsApp channel