BJP Opposed Shrikant Shinde : कल्याण मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. भाजपने या मतदार संघावर दावा केला असतांना, आता जर भाजप उमेदवार न दिल्यास श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका गोळीबार प्रकरणातील आमदार गणेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसा ठराव काल रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे शिंदे आणि गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस वाढली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. येथील उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. येथून ते निवडणूक देखील आले आहेत. मात्र, या जागेवर भाजपने दावा केला असून अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मुळे एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. दरम्यान, या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आता कलगितुरा चांगलाच रंगला आहे. शुक्रवारी रात्री हा वाद शिगेला पोहोचला. कारण, कल्याणमधील स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी बैठक घेत श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार न करण्याची भूमिका घेतली. त्यांनी ही जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह धरला असून जर ही जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसा ठरव देखील शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री गायकवाड यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कल्याण लोकसभेची जागा ही भाजपला मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. तसेच गणपत गायकवाड यांचे समर्थन करण्यासाठी मोठी घोषणा बाजी देखील यावेळी करण्यात आली.
कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात बैठकीबाबत काही माहिती नाही. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी होतो. दरम्यान, गणपत गायकवाड यांच्या पाठीशी केवळ कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्तेच नाही तर संपूर्ण भाजपचा त्यांना पाठिंबा आहे, असे भाजपचे कल्याणचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी म्हणाले.
जमिनीच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भर पोलिस ठण्यातच गोळीबार केला होता. त्यामुळे भाजप आमदार गायकवाड समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांना मदत न करण्याची भूमिका घेतल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील भडकले असून जर मदत केली नाही तर गणपत गायकवाड यांना जामीन देखील मिळू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
संबंधित बातम्या