Shantigiri Maharaj : राज्यात १३ मतदार संघात ५ व्या टप्प्यातील मतदान होत आहे. आज नाशिक येथेही मतदान होत आहे. मात्र, मतदानापूर्वी ईव्हीएममशीनला हार घातल्याने अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर कारवाईची शक्यता आहे. आचारसंहिता उल्लंघन केल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरमधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले. यापूर्वी त्यांनी ईव्हीएमला हार घातला.
राज्यात आज मतदानाची धामधूम सुरू आहे. आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये देखील मतदान सुरू आहे. दरम्यान, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क आज सकाळी ८ वाजता बजावला. त्यांनी त्रम्बकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मात्र, मतदान केल्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातील हार हा ईव्हीएम मशीनला घातला. यावेळी त्यांनी प्रसिद्धी मध्यमानशी बोलतांना सांगितले की, आम्ही सर्व गोष्टींमध्ये देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव असून त्यामुळे हार घातल्याचे ते म्हणाले. या पूर्वी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून नमस्कार देखील केला. मात्र, शांतिगिरी महाराजांचे हे कृत्य म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे.
शांतीगिरी महाराजांनी सकाळी ८ वाजता मतदान केल्यावर त्यांच्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. त्यामुळे हा आचार संहितेचा उल्लंघन असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली असून या मुळे शांतिगिरी महाराज यांना हे प्रकरण आता भोवण्याची शक्यता आहे.
राज्यातील आज शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे, नाशिकच्या निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. सर्व उमेदवारांनी मतदान करण्यापूर्वी देवाचा आशिर्वाद घेऊन मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतले तर मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी देखील देवाचे दर्शन घेऊन मतदान केले. तर शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी अभिषेक करत मतदान केले.