Ratnagiri Lok sabha : कोकणात मोठी राजकीय घडामोड; सख्ख्या भावांचा वाद चव्हाट्यावर, कार्यालयातून पोस्टर हटवले
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ratnagiri Lok sabha : कोकणात मोठी राजकीय घडामोड; सख्ख्या भावांचा वाद चव्हाट्यावर, कार्यालयातून पोस्टर हटवले

Ratnagiri Lok sabha : कोकणात मोठी राजकीय घडामोड; सख्ख्या भावांचा वाद चव्हाट्यावर, कार्यालयातून पोस्टर हटवले

May 01, 2024 07:56 PM IST

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : कोकणात मोठी राजकीय घडामोड समोर आली असून शिवसेना नेते किरण सामंत यांनी स्वतंत्र वाटचालीचे संकेत देत कार्यालयातून उदय सामंत यांचे फोटो व बॅनर हटवले आहेत.

किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातून उदय सामंतांचे बॅनर व फोटो हटवले
किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातून उदय सामंतांचे बॅनर व फोटो हटवले

Ratnagiri sindhudurglok sabha constituency : राज्यातलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय आरोप-प्रत्यारोपाबरोबरच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आता कोकणातून एक मोठी बातमी आली आहे. उद्योजक व शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत(kiran samant)समर्थकांनी उदय सामंत(uday samant)यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनर हटवले आहेत. सावंत भावांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

किरण सामंत आणि उदय सामंत दोन सख्खे भाऊ असून आता किरण सामंत यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर किरण सामंत संपर्क कार्यालय असं पोस्टर लावलं आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि किरण सामंत यांचा फोटो लावण्यात आला असून उदय सामंत यांचा फोटो हटवला आहे.

रत्नागिरीत किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावलेला मंत्री उदय सामंत यांचा फोटो व बॅनर अचानक हटवण्यात आला आहे. किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र त्यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मात्र याबाबत किरण सामंत यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. किरण सामंतयांच्या कार्यकर्त्यांच्या या कृतीतून त्यांनीस्वतंत्र वाटचालीचे संकेतदिले आहेत.

किरण सामंत यांनी आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे उघडपणे सांगितले होते. मात्र हा मतदारसंघ भाजपला गेल्याने किरण सामंत यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांचे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत होते. त्यांनी उदय सामंत यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता. किरण सामंत आणि उदय सामंत या दोन भावांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली.

 

भाजपने या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नारायण राणे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात सामना होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७मे रोजी मतदान होणार आहे.

Whats_app_banner