Raj Thackeray press conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अयोध्येत राम मंदिर उभे राहू शकले. त्यांच्या काळात सीएए, कलम ३७० मागे हटवण्यात आले. त्यांनी अनेक खंबीर निर्णय गेल्या पाच वर्षात घेतले असल्याने त्यांना पुन्हा संधि देण्याचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्ट केले. दरम्यान, महायुतीचा प्रचार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले असून आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधावा याची यादी देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच मनसेच्या नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त सभा घेत महायुतीला पाठींबा जाहीर केला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील काही जण नाराज होते. दरम्यान, त्यांनी हा निर्णय का घेतला, तसेच लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या बैठीक बोलावली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत, मोदी यांना पाठिंबा का दिला याची माहिती देत निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.
महायुतीच्या प्रचारात सहभाग घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. प्रचारासाठी मनसेनेत्यांची यादी येत्या दोन दिवसांत तयार करण्यात येणार असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांना सन्मानाने वागवतील अशी अपेक्षा आहे. मी माझ्या पदाढीकऱ्यांना महायुतीला पूर्णपणे सहकार्य करण्याचे सांगितले आहे. केवळ या नेत्यांशीच संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला जावा असे ठाकरे म्हणाले. जे काही निर्णय होतील, त्यात या नेत्यांना सहभागी करून त्यांची देखील मते जाणून घेऊन निर्णय घेतला जाईल असे ठाकरे म्हणाले.
महायुतीच्या नेत्यांकडून आमच्या नेत्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी अशी आशा देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. जी यादी महायुतीच्या नेत्यांना दिली जाईल, त्यांना सर्व बैठकांना बोलावून त्यांना योग्य वागणूक दिली जाईल असे ठाकरे म्हणाले.
मोदी यांना का पाठिंबा दिला या बाबत बोलतांना राज ठाकरे म्हणाले. मोदी यांनी गेल्या पाच वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात राम मंदिराचा उल्लेख करावा लागेल. कोर्टाने निकाल दिला असला तरी ऐवढ्या कमी कालावधीत मंदिर हे मोदी यांच्यामुळेच उभे राहू शकते. त्यांनी या बाबत घेतलेले योग्य निर्णय त्यामुळे हे शक्य झाले. त्यांच्या काळात सीसीए, नोटबंदी व कलम ३७० हटवल्या गेल्याने आज देशात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. ते खंबीरपणे निर्णय घेत असल्याने त्यांना पाठींबा दिला. मात्र, पाठिंबा देतांना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना हे निर्णय समजत नाही ते त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहे, असे पक्षातील राजीनामा देणाऱ्यांवर प्रतिक्रिया देतांना राज ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या सोबत राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे ठाकरे म्हणाले. यात गड किल्ल्यांचे संवर्धन, राज्यात उद्योगांना प्राधान्य, या सारखे अनेक विषय बोलले आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी सर्वांना सामान वागणूक द्यावी. ते गुजरातचे असयाने त्यांचे गुजरातवरील प्रेम असणे साहजिक आहे. पण देशातील इतर राज्ये देखील त्यांची अपत्ये आहेत, या भूमिकेतून त्यांनी इतर राज्यांच्या देखील विकास करावा असे ठाकरे म्हणाले.
महायुतीला पाठिंबा दिल्यावर सभा घेणार का, असे विचारल्यावर ठाकरे यांनी सभा घेणार असल्याचे संगीतले. या साठी मैदाने जागा बुक करून त्या संदर्भात परवानगी घ्यावी लागते. सध्या या बाबत प्रक्रिया सुरू असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे ठाकरे म्हणाले.