rahul gandhi to contest from raebareli : रायबरेली आणि अमेठीतून कोण लढणार यावरून काँग्रेसच्या गोटात सुरू असलेली चर्चा समाप्त झाली आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांची दुसरी उमेदवारी आज जाहीर केली आहे. राहुल गांधी या निवडणुकीत अमेठीतून नाही तर रायबरेलीतून (Raebarli Lok Sabha Election) निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली असून ते भाजप उमेदवार स्मृति इराणी यांच्या विरोधात लढत देणार आहेत. राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. यावेळी त्यांच्या सोबत प्रियांका गांधी देखील उपस्थित राहणार असून जोरदार शक्ति प्रदर्शन करत काँग्रेस त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना या अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक लढवण्याची मागणी करत होते. मात्र, यावर निर्णय होत नव्हता. अखेर राहुल गांधी अमेठीतून नाही तर रायबरेलि येथून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियंका गांधी या फक्त प्रचार करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्याची शेवटची तारीख ३ मे आहे. असे असतानाही काँग्रेस पक्षाला अमेठी आणि राजबरेली या जागेवरून कुणाला उमेदवारी द्यावी यावरून ठरत नव्हते. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी अमेठी येथून अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेसचे घोडे कुठे अडले या बाबत चर्चा सुरू होती. आजपर्यंत या दोन जागांसाठी काँग्रेसने या दोन जागांसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले नव्हते. हे दोन्ही मतदार संघ कॉँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ होते. मात्र, गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपने ही दोन्ही मतदार संघ त्यांचे गढ बनवले आहे. गेल्या निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना या दोन जागांवरून निवडणूक लढवण्याची आग्रही मागणी करत होते. मात्र, या बाबत निर्णय होत नव्हता.
काँग्रेसने या दोन्ही जागांसाठी त्यांची यादी आज सकाळी जाहीर केली. या यादीत अमेठीतून के.एल. शर्मा तर राहुल गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांनी निवडणूक न लढवता पक्षाचा प्रचार करणार आहेत. काँग्रेसने अमेठीत स्मृती इराणी यांच्या विरोधात रायबरेलीमध्ये केएल शर्मा यांना तिकीट दिले आहे. राहुल गांधी हे वायनाड व्यतिरिक्त आता रायबरेलीतून देखील लढणार आहेत. राहुल हे वायनाड व्यतिरिक्त कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना रायबरेलीतून निवडणूक लढवण्यास राजी केले आहे. पक्षश्रेष्ठींचे सर्व प्रयत्न करूनही प्रियांका गांधी लढण्यास तयार झाल्या नाहीत, स्मृती इराणी यांनी अनेक दिवसांपासून राहुल गांधींवर अमेठीतून पळून गेल्याच आरोप केला होता. दोन्ही जागांसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. गांधी परिवाराच्या उपस्थितीत काँग्रेसने दोन्ही जागांवर उमेदवारी आणि रोड शोची तयारी पूर्ण केली आहे.
रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांचा सामना भाजपच्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी होणार आहे, जे २०१९ मध्ये सोनिया गांधी यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गुरुवारी दुपारी भाजपने योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीमधून उमेदवारी दिली आहे. सोनिया गांधींच्या विरोधात गेल्या निवडणुकीत दिनेश प्रताप सिंग यांना मिळालेली मते आतापर्यंत सोनियांच्या विरोधात लढलेल्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक होती. गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही राहुल दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. राहुल केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत जिथून त्यांनी २०१९ मध्ये विजय मिळवला होता आणि यावेळीही ते निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले.
राहुलच्या जागी अमेठीतून निवडणूक लढवणारे केएल शर्मा म्हणजेच किशोरी लाल शर्मा हे रायबरेलीमध्ये सोनिया गांधीं यांच्या खास जवळचे समजले जातात. केएल शर्मा यांनी राजीव गांधी आणि कॅप्टन सतीश शर्मा यांच्यासोबत अमेठीमध्ये काम केले आहे. ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिवही राहिले आहेत. अमेठीमध्ये केएल शर्मा यांना उमेदवार करून गांधी कुटुंबाने ही जागा लढवण्याची जबाबदारी आपल्या विश्वासू व्यक्तीवर सोपवली आहे.
संबंधित बातम्या