मराठी बातम्या  /  elections  /  ‘शक्ती’वरून घमासान! पंतप्रधान मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले..

‘शक्ती’वरून घमासान! पंतप्रधान मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 18, 2024 09:29 PM IST

Rahul Gandhi On Shakti : राहुल गांधी म्हणाले की, मोदींना माझे शब्द आवडत नाहीत,ते नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहित आहे की मी सत्य बोललो आहे.

पंतप्रधान मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचं चोख प्रत्युत्तर
पंतप्रधान मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचं चोख प्रत्युत्तर

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्कवरील भव्य सभेने झाला. या सभेत बोलताना राहुल गांधींनी भाजप व मोदींवर जोरदार हल्ला चढवला. आपली लढाई मोदीविरोधात नाही किंवा भाजपाविरोधात नसून मोदीच्या मखोट्यामागे असणाऱ्या शक्ती विरोधात आपला लढा सुरू आहे. तसंच, शक्ती हा शब्द हिंदू धर्मातील असल्याचंही ते बोलले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा मोदींनी ढालीप्रमाणे वापर करत त्याच्यावरून विरोधांना शक्तीचा विनाश करायचा आहे, अशी टीका केली. याला राहुल गांधींनीही त्यांच्या शक्ती शब्दावरून प्रत्युत्तर दिले आहे.

कर्नाटकमधील सभेत पंतप्रधान मोदी यांनी शक्ती शब्दावरून टीका केल्यानंतर राहुल गांधींनी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोदींना माझे शब्द आवडत नाहीत, ते नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहित आहे की मी सत्य बोललो आहे.

ज्या शक्तीचा उल्लेख केला आहे, ज्या शक्तीशी आपण लढत आहोत, त्या शक्तीचा मुखवटा मोदी आहेत. ही अशी शक्ती आहे की ज्याने आज भारतीयांचा आवाज, भारताच्या संस्था, सीबीआय, आयटी, ईडी, निवडणूक आयोग, मीडिया, भारतीय उद्योग आणि भारताची संपूर्ण घटनात्मक रचना आपल्या नियंत्रणात आणली आहे. याच सत्तेसाठी नरेंद्र मोदींनी उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ केली आहेत. तर दुसरीकडे काही हजार रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

मी उल्लेख केलेली तीच शक्ती भारताच्या बंदरांना, भारतातील विमानतळांना दिली जाते,तर भारताच्या तरुणांना अग्निवीराची भेट दिली जाते, ज्यामुळे त्यांचे धैर्य भंग पावते. त्याच शक्तीला रात्रंदिवस सलाम करत असताना देशातील माध्यमे सत्य दडपून टाकतात. महागाईवर नियंत्रण न ठेवता ती शक्ती वाढवण्यासाठी देशाच्या संपत्तीचा लिलाव करतात, असंही ते म्हणाले.

 

काय म्हणाले होते मोदी –

कर्नाटकमधील सभेत मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले की, त्यांना हिंदू धर्मातील शक्तीचा विनाश करायचा आहे. मात्र आम्ही शक्तीची पूजा करतो, ती शक्ती आमची सुरक्षाकवच आहे. आम्ही भारताच्या चांद्रयान शिवशक्तीला समर्पित केले आहे. भाजपासाठी शक्ती ही प्रत्येक स्त्रीचे प्रतीक आहे. माझ्यासमोर शक्ती-स्वरूपातील मुली,महिला,बहिणी आहेत. आमच्यासाठी भारतमाता शक्ती आहे.

WhatsApp channel