मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Pune loksabha result : पुण्यात रवींद्र धंगेकर यांना धक्का! पहिल्या फेरीपासून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची आघाडी कायम

Pune loksabha result : पुण्यात रवींद्र धंगेकर यांना धक्का! पहिल्या फेरीपासून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची आघाडी कायम

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 04, 2024 12:24 PM IST

Pune Lok Sabha Result 2024 : सर्व देशाचे लक्ष असलेल्या पुणे लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून यात भाजपचे मुरलीधार मोहोळ हे सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत.

भाजपचे मुरलीधार मोहोळ हे सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत.
भाजपचे मुरलीधार मोहोळ हे सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत.

Pune Lok Sabha Result 2024 : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे, आता पर्यंत पुणे लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या ६ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ यांनी ३७ हजारांची आघाडी घेतली आहे. दुस-या फेरीनंतर मोहोळांना १८ हजारांची आघाडी होती. परंतू, मतमोजणीला सुरवात झाल्यापासून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस कायम असून आघाडी- पिछाडीकहा खेळ सुरूच आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sanjay Raut : ईश्वराचा अवतारच पिछाडीवर गेला, हाच देशाचा कल आहे; संजय राऊत काय म्हणाले पाहा!

पुणे मतदारसंघाच्या निकालाकडे राज्यासोबत देशाचे लक्ष लागून आहे. दोन्ही उमेदवारांनी मीच जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केला होता. तर वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी देखील मीच निवडून येणार असा दावा केला होता. दरम्यान, मुरलीधर मोहोळ हे एकतर्फी निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी ही निवडणूक चुरशीची केली. त्यांनी अतिशय जोरदार टक्कर देत मुरलीधर मोहोळ यांचे टेंशन वाढवले होते. त्यामुळे मोहोळ निवडून येणार की धंगेकर बाजी मारणार याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. मात्र, आज सकाळ पासून मुरलीधर मोहोळ यांनी सुरवातीपासून आघाडी घेतली असून त्यांची ही आघाडी टिकून ठेवली आहे. मात्र, ही आघाडी कमी जास्त होत असल्याने मोहोळ यांची धाकधूक कायम आहे.

Shirur loksabha : शिरूरमधून सातव्या फेरीनंतरही डॉ. अमोल कोल्हे यांची आघाडी कायम! शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर

कसबा विधासभा मतदार संघाची मतमोजणी काही काळ थांबली

कसबा विधानसभा मतदारसंघातील पेट्यांची मतमोजणी काही काळ थांबविण्यात आली आहे. मतमोजणीतील आकडे चार मिनिटे उशिरा दिसत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.

पुणे लोकसभा मतमोजणी सहावी फेरी आकडेवारी

वडगाव शेरी - मोहोळ - ६०९३ - धंगेकर. - ४८०२

शिवाजीनगर -३४५७ - ३५७६

कोथरुड - ५३४५- ३३०७

पर्वती - ४७०९- ५२६७

कॅन्टोनेंंट - २३०९ - ४१९१

कसबा - ५३६२ - ३२८७

एकूण. - २७२७५ - २४४३०

मोहोळ यांची एकूण आघाडी - २८४५ (एकूण ३८५२८)

WhatsApp channel