PM Narendra Modi Maharashtra Visit: देशात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा, प्रचार दौरे, रोड शो यांचा सपाटा लावला आहे. राज्यात आतापर्यंत चंद्रपूर, रामटेक, वर्धा, धारशिव, पुणे, लातूर, सोलापूर आदि ठिकाणी मोदी यांच्या सभा झाल्या आहेत. आता पंतप्रधान मोदी हे पुन्हा आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी पीएम नरेंद्र मोदी हे दिंडोरी व कल्याण येथे आज सभा घेणार आहेत. तर यानंतर उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शोत ते सहभागी होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पुढील व शेवटच्यातील मतदांन महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान २० मे रोजी होणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि पालघर या मतदारसंघात हे मतदान होणार आहे. तर प्रचाराची सांगता ही १८ मे रोजी होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार हे प्रचारात व्यस्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जनसभांना संबोधित करून अनेकविध ठिकाणी रोड शो, रॅली करत असीब पाचव्या टप्प्यातील मतदाना पूर्वी प्रचार करण्यासाठी ते मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या मोईड यांच्या आजच्या कार्यक्रमानुसार, दुपारी पंतप्रधान मोदी हे दिंडोरी येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कल्याण येथे त्यांची प्रचारसभा सभा होणार आहे, तर घेणार आहेत.
कल्याण सभेनंतर उत्तर पूर्व मुंबईत होणार रोड शो होणार आहे. या रोड शोच्या माध्यमातून भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. या रोड जोरदार तयार भाजप आणि महायुतीच्या कार्यकऱ्यांनी केली आहे. विक्रोळी येथून पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शो मुळे या मार्गातील वाहतुक ही वळवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य रोड शो होणार आहे. भाजप महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी घाटकोपर येथे रोड शो घेणार आहेत. संध्याकाळी साडे सहा वाजता मोदींचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा ६.४५ मिनिटांनी सुरू होईल आणि ७.४५ ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर ते घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे संपेल.
मोदींच्या मुंबईतील रोड शोमुळे मुंबईचा एलबीएस मार्ग दुपारी २ ते १० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, मेघराज जंक्शन ते माहुल घाटकोपर रोडवरील आरबी कदम जंक्शनपर्यंत उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दोन्ही वाहतूक दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी १५ रोजी संपूर्ण एलबीएस मार्गावर आणि एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून १०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग लागू केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगाल व ओडिशा दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाह सकाळी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे एका सभेला संबोधित करतील यानंतर अमित शाह ओडिशाला रवाना जातील. ओडिशा येथे एका जिल्ह्यात ते निवडणूक प्रचारसभा आणि रोड शोत सहभागी होणार आहेत.
संबंधित बातम्या