PM Narendra Modi : भाजपच्या प्रचाराची धार वाढणार! महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांत ६ सभा होणार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Narendra Modi : भाजपच्या प्रचाराची धार वाढणार! महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांत ६ सभा होणार

PM Narendra Modi : भाजपच्या प्रचाराची धार वाढणार! महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांत ६ सभा होणार

Updated Apr 29, 2024 12:29 PM IST

PM Narendra Modi Visit in Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी आणि मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांत सहा सभा मोदी घेणार असून याची जय्यत तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

राज्यात दोन दिवसात होणार पंतप्रधान मोदींच्या झंझावाती सभा; भाजपच्या प्रचाराचा ज्वर वाढला
राज्यात दोन दिवसात होणार पंतप्रधान मोदींच्या झंझावाती सभा; भाजपच्या प्रचाराचा ज्वर वाढला (PTI)

PM Narendra Modi Visit in Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मोदी यांच्या आज सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचारसभा होणार आहेत.

Indian Rrailway : भारतीय रेल्वेचा प्रवाशांना दिलासा! आता मोबाईलद्वारे अनारक्षित तिकीट काढणे झाले सोपे

पुण्यातील सभेसाठी जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा होणार आहे. पुण्यातील रेसकोर्स येथे ही सभा होणार आहे. ही सभा संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास होणार आहे. ही सभा या पूर्वी एसपी कॉलेजच्या मैदानावर होणार होती. मात्र, या सभेची जागा बदलून आता रेसकोर्स मैदान करण्यात आली आहे. पुणे, बारामती, शिरूर, मावळ येथील महायुतिच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान मोदी आज करणार आहेत. या साठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Video : तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे इतके का भडकले?

दोन दिवसांत सहा सभा

पंतप्रधान मोदी मोदी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथे येणार आहे. तर कराड येथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ होणारी सभा ही दुपारी ३.४५ वाजता, पुणे येथील सभा संध्याकाळी ५.४५ वाजता हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर होणार आहे. ही सभा पुण्याचे महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळ चे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे.

Nagpur murder : आईला शिवीगाळ करण्यावरून भावांमध्ये जुंपली! मोठ्यानं केली सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

मंगळवारी येथे होणार सभा

मंगळवारी (३० एप्रिल) दुपारी ११.४५ येथे माढा मधील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे मोदी यांची सभा होणार आहे. तर दुपारी दीड वाजता धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ३ वाजता लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा होणार आहे.

सभेची जोरदार तयारी सुरू

भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांच्या सभांची जय्यत तयारी चालू आहे. या सभांच्या आयोजनाची जबाबदारी पुढील नेत्यांवर सोपविण्यात आली आहे . सोलापूरची जबाबदारी सचिन कल्याणशेट्टी, नरेंद्र काळे, कराड - धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, पुण्याची जबाबदारी राजेश पांडे, जयंत येरवडेकर, धीरज घाटे, माळशिरसची जबाबदारी जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, धाराशिव येथील जबाबदारी राणाजगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, लातूर येथील सभेची संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड, अरविंद निलंगेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या