Priyanka Gandhi : सारखं रडताय कशाला... जरा इंदिरा गांधींकडून शिका, प्रियंका गांधींचा नंदूरबारच्या सभेत मोदींना टोला-pm modi should learn from indira gandhi priyanka gandhi in nandurbar rally ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Priyanka Gandhi : सारखं रडताय कशाला... जरा इंदिरा गांधींकडून शिका, प्रियंका गांधींचा नंदूरबारच्या सभेत मोदींना टोला

Priyanka Gandhi : सारखं रडताय कशाला... जरा इंदिरा गांधींकडून शिका, प्रियंका गांधींचा नंदूरबारच्या सभेत मोदींना टोला

May 11, 2024 08:56 PM IST

Priyanka Gandhi on Modi : मोदीजी थोडे तरी धैर्य दाखवा, हे सार्वजनिक जीवन आहे. इंदिरा गांधींकडून काहीतरी शिका त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. त्यांच्याकडूनधैर्य,दृढनिश्चय आणि शौर्य काय असते ते शिकून घ्या, असा टोला प्रियंका गांधींनी मोदींना लगावला.

प्रियंका गांधींचा नंदूरबारच्या सभेत मोदींना टोला
प्रियंका गांधींचा नंदूरबारच्या सभेत मोदींना टोला

Nandurbar Lok sabha Constituency : नंदुरबार मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांची शनिवारी नंदुरबार येथे सभा झाली. या सभेत प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi Vadra) मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सभांमधून केवळ पोकळ आश्वासने व घोषणा करतात. त्यांनी धाडस व निर्धार हे गुण माजी पंतप्रधान इंदिरा गांधींकडून शिकून घ्यावेत. मोदी स्टेजवर येतात व रडायला सुरूवात करतात आणि म्हणतात की, मला शिवीगाळ केली गेली. अशी बोचरी टीका प्रियंका गांधींनी मोदींवर (Narendra Modi) केली आहे. (Priyanka Gandhi Nandurbar rally)

प्रियंका गांधी म्हणाल्या, मोदीजी थोडे तरी धैर्य दाखवा, हे सार्वजनिक जीवन आहे. इंदिरा गांधींकडून काहीतरी शिका त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. त्यांच्याकडूनधैर्य,दृढनिश्चय आणि शौर्य काय असते ते शिकून घ्या.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, मोदींनी महाराष्ट्रातील लोकांच्या जनमताचा अनादर केला आहे. तुम्ही मतदानाच्या माध्यमातून निवडलेले सरकार मोदींनी सत्तेच्या व बळाच्या जोरावर पाडले व आपल्या मर्जीतील सरकार तेथे बसवले. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की,भाजप आदिवासीची संस्कृती व परंपरेचा अनादर करते. आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसद भवनाचे उदघाटन, तसेच राममंदिराचे उदघाटन त्यांच्या हस्ते का केले नाही,असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

प्रियंका गांधींनी मोदींवर टीका करताना म्हटले होते की,जनतेच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार होते. तसेच २ कोटी नोकऱ्या देणार होते. मोदी भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचे म्हणतात मात्र सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना पावन करून घेतात.

प्रियंका गांधींनी मणिपूरच्या घटनेवरून मोदी व भाजपवर टीका केली. मणिपूरमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आले. महिलांवर बलात्कार करून त्यांना अनेक लोकांसमोर विवस्त्र करण्यात आले. अनेकांचे जीव गेले. अनेक घरांना आगी लावल्या गेल्या मात्र मोदींनी यावर अवाक्षरही काढले नाही.