मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Narendra Modi investment : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती इन्कम टॅक्स भरतात? त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक कोणती? वाचा

Narendra Modi investment : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती इन्कम टॅक्स भरतात? त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक कोणती? वाचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 15, 2024 08:45 AM IST

PM Modi investment : पीएम मोदी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय ५२ हजार ९२० रुपयांची रोकड आहे. विशेष म्हणजे पीएम मोदींची बहुतांश मालमत्ता एफडीच्या रूपात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती आयकर भरतात? त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक कोणती? वाचा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती आयकर भरतात? त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक कोणती? वाचा

Narendra Modi investment : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी वाराणसी मतदारसंघातून मोठे शक्ति प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे संपूर्ण विवरण देण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?

मोदी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय ५२ हजार ९२० रुपयांची रोकड आहे. विशेष म्हणजे पीएम मोदींची बहुतांश मालमत्ता ही एफडीच्या रूपात आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात मोदी यांनी सर्वाधिक एफडी या स्टेट बँक ऑफ इंडियात केल्या आहेत. त्यांची सर्वात मोठी गुंतवणुकीची एफडी ही २ कोटी ८५ लाख रुपयांची आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये होणार सभा, तर मुंबईत रोड शो

मोदी यांच्याकडे याशिवाय प्रत्येकी ४५ ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची किंमत २ लाख ६७ हजार रुपये आहे. पंतप्रधान मोदींकडे ९ लाख १२ हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा एनएससी ही सरकारची एक निश्चित उत्पन्न योजना आहे. यात देखील मोदी यांनी गुंतवणूककेली आहे. या योजनेचे फायदे पोस्ट ऑफिसमधून नागरिकांना दिले जातात. क्लियर टॅक्सचा हवाला देत माध्यमांनी असे म्हटले आहे की, एनएससी दरवर्षी ७.७ टक्के व्याज मोदी यांच्या बचतीवर देते. याशिवाय कलम ८० सी अंतर्गत देखील त्यांना फायदेही मिळतात. एनएससी मध्ये लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे. तसेच १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किती आयकर भारतात?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पीएम मोदी यांनी गेल्या आर्थिक वर्षात ३ लाख ३३ हजार रुपयांचा आयकर भरला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या कडे स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडे शेतजमीन आणि मालमत्ता नाही असे त्यांच्या प्रतिज्ञा पत्रातून पुढे आले आहे.

WhatsApp channel