मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sharad pawar : त्यांनी स्वतःचं कुटुंब कुठं सांभाळलं? नरेंद्र मोदी यांच्या टीकेला शरद पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर

sharad pawar : त्यांनी स्वतःचं कुटुंब कुठं सांभाळलं? नरेंद्र मोदी यांच्या टीकेला शरद पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2024 11:12 AM IST

Sharad Pawar on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पावर हे त्यांचे कुटुंब सांभाळू शकले नाही असे मोदी म्हणाले होते. या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठं सांभाळलं? मोदी यांच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर
मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठं सांभाळलं? मोदी यांच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर

Sharad Pawar on PM Modi: लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत टीका केली होती. मोदी म्हणाले होते, की शरद पवार या वयात त्यांचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळतील? मोदी यांच्या या टीकेला शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले, मला सुद्धा मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले आहे ? मी त्यांच्या सारखा खालच्या स्थरावर जाऊ इच्छित नाही. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पण, असे व्यक्तिगत बोलणे योग्य नाही. हे पथ्य पंतप्रधान मोदी यांनी पाळले नसले तरी मी सुद्धा हे पथ्य न पाळणे योग्य नाही. त्यामुळे मी ही भूमिका घेणे योग्य होणार नाही असे पवार म्हणले.

Raj Thackeray: 'सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणे शक्य नाही'; 'त्या' ऑफरवर राज ठाकरे यांचे सणसणीत उत्तर

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात झालेल्या सभेत शरद पवार यांना असंतुष्ट आत्मा संबोधले होते. त्यानंतर त्यांनी परवा एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना पुन्हा शरद पवार यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी वरील उत्तर दिले आहे.

पवार म्हणाले, मोदी यांनी डॉ. मनमोहन यांच्या अनेक धोरणांवर टीका केली. मात्र, हेच मोदी आज मनमोहन सिंग यांची धोरणे राबवत आहेत. हा मोठा विरोधाभास आहे. मनमोहन सिंग आणि मोदी यांच्या १०-१० वर्षांच्या कालावधीची तुलना आज नागरिक करत आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांचे कामकाज वैशिष्ट पूर्ण होतं. सिंग हे कोणताही गाजावाज्या न करता ते शांतपणे काम करायचे. या सोबतच ते रिजल्ट देखील द्यायचे. मात्र पंतप्रधान मोदी यांचा रिजल्टशी काही संबंध नाही. त्यांचा वेळ हा वैयक्तिक टीकाकरण्यात जातो. लोकांना हे सर्व डोळ्याने दिसत आहे.

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

पंतप्रधान मोदींनी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखीतत उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. ते जेव्हा अडचणीत येतील, तेव्हा ते त्यांच्या मदतीला धावून जाणार मी पहिला असेल, असे मोदी म्हणाले होते. यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, “मोदींनी लाख काहीही म्हटले असले तरी आमची प्रार्थना असेल की, उद्धव ठाकरेवर मोदी यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये.”

पवार म्हणाले, भाजपने मोठी घोषणा दिली आहे. ‘अब की बार ४०० पार’ त्यांना करायचे आहे. मात्र, हे करतांना भाजपाची मोठी दमछाक होत आहे. भाजपाने त्यांचा ४०० पार आकडा हा खाली आणला आहे. निवडणुकीच्या निकालात हे सर्व स्पष्ट होणार आहे.

WhatsApp channel