PM Modi In Jabalpur : पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला! १० पेक्षा जास्त नागरिक जखमी
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi In Jabalpur : पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला! १० पेक्षा जास्त नागरिक जखमी

PM Modi In Jabalpur : पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला! १० पेक्षा जास्त नागरिक जखमी

Published Apr 08, 2024 07:32 AM IST

PM Modi Roadshow In Jabalpur : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोदरम्यान मोठा अपघात झाला. कटंगा ते गोरखपूर मार्गावर रॅली दरम्यान, स्टेज तुटल्याने काही नागरिक खाली कोसळून जखमी झाले.

पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला! १० पेक्षा जास्त नागरिक जखमी
पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला! १० पेक्षा जास्त नागरिक जखमी

PM Modi Roadshow In Jabalpur : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा देशात प्रचारात व्यस्त आहे. रविवारी रात्री मध्यप्रदेशात जबलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये पीएम मोदी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या रॅलीत तीन स्टेज उभारण्यात आले होते. मात्र, त्यावर क्षमते पेक्षा जास्त नागरिक असल्याने हे स्टेज कोसळले. या घटनेत १० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत. मोदी यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. पीएम मोदी उघड्या जीपमध्ये बसून लोकांना अभिवादन करत होते यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. या रोड शो दरम्यान, तीन स्टेज तयार करण्यात आले होते. या स्टेजवर मोठ्या प्रमाणात नागरिक असल्याने गोरखपूर परिसरात दोन स्टेज तुटल्याने त्यावर असलेले नागरिक खाली पडले. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nagpur News : नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी

स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात झाला. पीएम मोदींचा हा रोड शो गोरखपूरच्या कटंगा चौकातून सुरू झाला आणि नॅरोगेजपर्यंत एक किलोमीटरहून अधिक लांब हा रोड शो चालला. रोड शोच्या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. अनेक ठिकाणी लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत होते. अनेक लोक हातात पीएम मोदींचे फोटो घेऊन पोहोचले होते.

Maharashtra Weather Update : राज्यात संमिश्र वातावरण! कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस; असे असेल हवामान

या रोड शो दरम्यान तेथे जमलेल्या नागरिकांच्या हातात भारतीय जनता पक्षाचा झेंडे दिसत होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात कमळाचे कटआऊट दिसले. हे कटआउटही पंतप्रधान लोकांना दाखवत होते. या रोड शोमध्ये पीएम मोदींसोबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, भाजपचे उमेदवार आशिष दुबे उपस्थित होते. यावेळी जमाव पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करत होता.

जय श्री रामच्या घोषणा

मध्य प्रदेशात भाजपचालोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपने घरोघरी जाऊन आणि पिवळे तांदूळ देऊन पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी लोकांना आमंत्रित केले होते. रोड शोच्या सुरक्षेसाठी तीन हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. या रोड शोची सुरुवात मंत्रोच्चाराने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समर्थकांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या.

Pune News : धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून केली हत्या

जबलपूर येथून निवडणूक प्रचाराला सुरुवात

या रोड शोमध्ये ५० हजार लोक सहभागी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. जबलपूरमधील या रोड शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज्यात लोकसभेच्या २९ जागा असून चार टप्प्यात मतदान होणार आहे. जबलपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराची काँग्रेसच्या दिनेश यादव यांच्याशी स्पर्धा आहे. एक खास गोष्ट म्हणजे इथे फक्त पंतप्रधानांनी रोड शो केला आहे आणि इथे त्यांनी अजून एकाही जाहीर सभेला संबोधित केलेले नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राकेश सिंह यांनी ही जागा जिंकली होती. जबलपूरबद्दल असे म्हटले जाते की एकीकडे आदिवासी समाजातील लोकांचा या जिल्ह्याशी संबंध आहे तर दुसरीकडे या भागावर विंध्यापर्यंतच्या संपूर्ण महाकौशलचा प्रभाव आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या