मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Mumbai: राजकीय पक्ष करणार आज जिवाची मुंबई! शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकत्र, तर बीकेसीत इंडिया आघाडीची सभा

Mumbai: राजकीय पक्ष करणार आज जिवाची मुंबई! शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकत्र, तर बीकेसीत इंडिया आघाडीची सभा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 17, 2024 08:45 AM IST

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे. मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची विराट प्रचार सभा होणार आहे. बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची तर शिवाजी पार्कवर मोदी व राज ठाकरेंची एकत्र सभा होणार आहे.

मुंबईत आज राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे.
मुंबईत आज राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे.

Mumbai Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबईतील विविध लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मुंबई जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज मुंबईत दोन्ही आघाड्यांकडून विराट प्रचार संभाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. तर बीकेसी मैदानावर इंडिया आघाडी नेत्यांची विराट सभा आज होणार आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

राज्यात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहे. पाचव्या टप्यासाठी सोमवारी २० मे रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती व इंडिया आघाडीची आज मुंबईत प्रचार सभा होणार आहे. शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सुमारे सव्वालाख लोक या सभेला उपस्थित राहतील, अशी शक्यता महायुतीच्या नेत्यांनी वर्तवली आहे. तसे नियोजन देखील करण्यात आले आहे. तब्बल ७५ हजार खुर्चांची व्यवस्था करण्यात आली आहे तर मोठे स्क्रीन आणि ध्वनीक्षेपक देखील लावण्यात आले आहेत. या सभेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइनही मिळणार बाजारासारखी भाजी खरेदीची मजा

बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीचीही प्रचारसभा होणार असून या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. या सर्व पक्षांचे कार्यकर्ते, मतदार या सभेला येणार आहे. त्यामुळे ही सभा देखील विरात होणार आहे. सभेसोबतच इंडिया आघाडीनेही मुंबईत मेगा रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत विरोधी पक्षांचे बडे नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता ही रॅली होणार असून या रॅलीमध्ये गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य सहभागी होणार नअसल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबईच्या ६ मतदार संघात होणार मतदान

२० मे रोजी मुंबईच्या ६ मतदारसंघात मतदान होणार आहे. यात ठाणे, कल्याण, पालघर येथे मतदान होणार आहे. या मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजेच १८ मे रोजी प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज महायुती व महाविकास आघाडीच्या भव्य सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

WhatsApp channel