PM Modi: प्रचारासाठी मोदी यांचा पुन्हा विदर्भ दौरा! पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरला मुक्कामी थांबणार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi: प्रचारासाठी मोदी यांचा पुन्हा विदर्भ दौरा! पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरला मुक्कामी थांबणार

PM Modi: प्रचारासाठी मोदी यांचा पुन्हा विदर्भ दौरा! पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरला मुक्कामी थांबणार

Apr 16, 2024 09:11 AM IST

PM Modi campaign in Vidarbha loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024) दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर येथून फोडणार आहे. त्यांची १९ एप्रिलला सभा होणार असून या निमित्त ते नागपूरला (Nagpur News) मुक्काम करणार आहे.

प्रचारासाठी मोदी यांचा पुन्हा विदर्भ दौरा! पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरला मुक्कामी थांबणार
प्रचारासाठी मोदी यांचा पुन्हा विदर्भ दौरा! पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरला मुक्कामी थांबणार (PTI)

PM Modi campaign in Vidarbha loksabha election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा ज्वर वाढत आहे. अशात महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्यात होणाऱ्या निवडणुकांच्या झंजावाती प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात येणार आहे. ते नागपूर येथून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यांची १९ एप्रिलला वर्धा येथे सभा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी एक दिवसांचा मुक्काम नागपूर येथे करणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून ते पहिल्यांदाच मुक्कामी थांबणार आहेत.

Salman Khan Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना गुजरातमधून अटक

राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे. तर रामटेक येथेही त्यांची सभा झाली आहे. यानंतर राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला येणार आहे. त्यांची वर्धा येथे १९ एप्रिलला सभा होणार आहे. नागपूर मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपकडून उभे आहेत. तर वर्धा येथून विद्यमान खासदार रामदास तडस हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० एप्रिल रोजी देखील सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर १७ किंवा १८ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नागपूरला येण्याची शक्यता आहे.

Bombay high court : झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार; रात्रभर चौकशी करता येणार नाही! हायकोर्टाने ईडीला फटकारले

वर्धा येथे होणार जाहीर सभा

मोदी यांची १९ एप्रिल रोजी वर्धा येथे सभा होणार आहे. यानंतर ते नागपूरला मुक्कामी थांबण्याची शक्यता आहे. तर २० एप्रिल रोजी मोदी परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे होणाऱ्या सभांना संबोधित करण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे.

RTE Admission : राज्य शासनाला अखेर मुहूर्त मिळाला! आज पासून आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू

या पूर्वी राज्यात झाल्या दोन सभा

पंत प्रधान मोदी यांच्या यापूर्वीच चंद्रपूर व रामटेक येथे सभा झाल्या आहेत. या ठिकाणी महायुतीने भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उद्या १७ किंवा १८ एप्रिल रोजी प्रचारासाठी नागपुरात येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान झाल्यावर नागपूरमध्ये पहिल्यांदा मुक्कामी थांबणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 19 एप्रिलला वर्धा येथील सभा झाल्यावर २० तारखेला देखील सभा आहेत. १९ सभा झाल्यावर ते नागपूर येथे मुक्कामी थांबणार आहेत. वर्धा येथे भाजपचे रामदास तडस उमेदवार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा मोदी हे नागपूरला मुक्कामी थांबणार आहेत. गेल्या १० दिवसांत मोदी यांचा हा दुसरा विदर्भ दौरा असेल. त्यांनी सर्वप्रथम चंद्रपूर येथे सभेला संबोधित केले होते. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा झाली. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत.

Whats_app_banner