महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या आरोपांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात विधानसभेचे २८८ मतदारसंघ आहेत.
राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांच्या महायुतीची सत्ता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा महाविकास आघाडी व महायुतीतील जागा वाटपानंतर होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) या पक्षानं आतापासूनच उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे.
मनसेने आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई, पंढरपूर व वणी (यवतमाळ) येथील उमेदवार जाहीर केले आहेत.