महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या आरोपांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
Rahul Narwekar unopposed elected Maharashtra Assembly speaker : गेल्या अडीच वर्षांपासून विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनरोध निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने त्यांची निवड करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: मुंबईत आझाद मैदानावर आज देवेंद्र फडणवीस यांचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Markadwadi news : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतपत्रीकेवर मतदान आयोजित केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे
Markadwadi Voting : माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये आज मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत. काही झाले तरी हे मतदान होणार असे ग्रामस्थांनी जाहीर केलं आहे. यामुळे या गावात जमाबबंदी लागू करण्यात आली आहे.
maharashtra cm : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोघे नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत.
Maharashtra New CM : राज्यात मुख्यमंत्रिपदाचं नाव अद्याप जाहीर झालं नाही. मुख्यमंत्री पदावरून व मंत्रीमंडळावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार? या बाबत एका मोठ्या भाजप नेत्याने नाव जाहीर केलं आहे.
PM Modi Viral Video: सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी करत आहेत.
Malshiras Assembly constituency Result: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावातील मतदारांना भाजपच्या राम सातपुते यांना मिळालेल्या मते अमान्य असून त्यांनी बॅलेटपेपरवर पुन्हा निवडणुक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Hadapsar Assembly Constituency : राज्यात हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे. या साठी त्यांनी मोठी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे.
Raj Thackeray to MNS workers : निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याच्या तक्रारी मनसेच्या उमेदवारांनी केल्यानंतर राज ठाकरे यांनी या संदर्भातील पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले असते तर महाविकास आघाडीची दाणादाण झाली नसती असं मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेतही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला मतांचा टक्का कायम ठेवला असून ही टक्केवारी परिवर्तन आघाडी व मनसेपेक्षा अधिक आहे.
Maharashtra CM News : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आज गृहमंत्री अमित शहा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शहा यांच्या उपस्थित मुख्यमंत्रिपद आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाच्या नियुक्तीबाबतही चर्चा होणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे एकाच गाडीत दिल्लीत दिसले.
maharashtra govt formation: निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे राज्याची सूत्रे हाती घेतील, असे मानले जात असताना शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर आपला आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.
Sudhakar Badgujar : नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. त्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
Prashant Jagtap on EVM : महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची व महत्वाच्या पदाधीकाऱ्यांची आज पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत प्रश्नात जगताप यांनी ईव्हीएम इस्रायली तंत्रज्ञानाने हॅक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Rajesh Yerunkar on Election Process : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असताना मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
Who is Sumit Wankhede : देवेंद्र फडवणीस यांचे पीए सुमित वानखडे यांनी आर्वी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक वर्धा जिल्ह्यातून सर्वाधिक मते मिळवत निवडून आले आहेत. त्यांनी खासदार अमर काले यांच्या पत्नी मयूरा काळे यांचा पराभव केला.
D. Y. Chandrachud on Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या विधानावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड चांगलेच भडकले. चंद्रचूड म्हणाले, त्यांच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय झाले. हे निर्णय कोणत्याही दबावात देण्यात आलेले नाहीत.
महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महायुतीची सत्ता आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) हे तीन पक्ष आहेत. त्याशिवाय, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे लहान पक्षही महाविकास आघाडीत आहेत.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे हा पक्ष कोणत्याच आघाडीत नाही. लोकसभा निवडणुकीत मनसेनं नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, हा पक्ष अधिकृतरित्या महायुतीत सहभागी नव्हता. येत्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी सध्या महायुती किंवा महाआघाडीमध्ये नाही. लोकसभेला वंचितनं स्वतंत्र निवडणूक लढली होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांसह सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यामुळं विधानसभेला ते काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.
शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा समावेश आहे.