Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूकीचे निकाल आता हाती येत आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण दिसत आहे. तर इंडिया आघाडीने चांगली कामगिरी करत बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे. त्यामुळे आता पुढची खेळी खेळण्यास इंडिया आघाडीने सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसनं पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. वेळ पडल्यास सध्या एनडीएच्या गोटात असलेल्या नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चेची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. आता चित्र हळू हळू स्पष्ट होतांना दिसत आहेत. सध्याच्या निकाला नुसार देशात भाजप आणि एनडीएला मोठा धक्का बसतांना दिसत आहे. भाजपने निवडणुकीच्या सुरुवातीला ४०० शे पारचा नारा दिला होता. मात्र, सध्या येणाऱ्या निवडणूक निकालावरुन भाजपला बहूमताचा आकडा मिळणे कठीण झाले आहे. इंडिया आघाडीने या निवडणुकीत जोरदार कमबॅक केले आहे. सध्या भाजपला २४० जागांवर आघाडीवर आहे, तर एनडीए २९१ जागांवर पुढे आहे. तर कॉँग्रेस ९२ जागांवर आघाडीवर आहेत तर इंडिया आघाडी ही २३१ जागांवर पुढे आहे.
सध्याच्या निकालावरुन आता काँग्रेसने आणि इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांनी भाजपला धोबीपछाड देण्याची तयारी सुरू केली आहे. या बाबत दिल्लीत मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने भाजपच्या गोटातील टीडीपी व नितीश कुमार या दोघांशीही चर्चा करण्याची तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीचे संख्याबळ सत्ता स्थापनेसाठी कमी पडले, तर त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी ही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बाबतची जबाबदारी ही शरद पवार यांना दिली जाऊ शकते.
सध्याच्या निवडणूक निकालानुसार बिहारमध्ये एकूण ४० पैकी १५ ते १६ जागांवर नितीश कुमारांची जेडीयू आघाडीवर असून भाजपला ११जागांवर पुढे आहे. चंद्रबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष हा १६ जागांवर आघाडीवर आहे. सध्या जेडीयू आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष एनडीएत आहेत. त्यामुळे आता त्यांना इंडिया आघाडीत आणण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या