मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Election 2024 : पहिल्यांदा मतदान करताय? ही महत्वाची कागदपत्रे ठेवा जवळ; पाहा यादी

Loksabha Election 2024 : पहिल्यांदा मतदान करताय? ही महत्वाची कागदपत्रे ठेवा जवळ; पाहा यादी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 12, 2024 01:38 PM IST

Loksabha Election 2024 importent document : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहे.

पाहिल्यांदा मतदान करताय? ही महत्वाची कागदपत्रे ठेवा जवळ; निवडणूक आयोगाचे आवाहन
पाहिल्यांदा मतदान करताय? ही महत्वाची कागदपत्रे ठेवा जवळ; निवडणूक आयोगाचे आवाहन (HT)

Loksabha Election 2024 importent document : राज्यात उद्या सोमवारी (दि १३) ११ लोकसभा मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या सर्व मतदार संघात मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहे. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

पुणे जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १३ मे रोजी मावळ, पुणे आणि शिरूर या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदारांनी मतदार ओळखपत्र सादर करावे लागणार आहे.

Pune Lokasbha Election : पुणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान! सात हजार पोलिस तैनात, ईव्हीएमचे वितरण

हे पुरावे धरले जाणार ग्राह्य

छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

WhatsApp channel