मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Election : उद्या लोकसभेचा निकाल, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबई, पुण्यात चोख बंदोबस्त

Loksabha Election : उद्या लोकसभेचा निकाल, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबई, पुण्यात चोख बंदोबस्त

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 03, 2024 08:54 AM IST

Loksabha Election 2024 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात उद्या मंगळवारी (दि. ४) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

राज्यातील ४८ मतदार संघात उद्या मंगळवारी (दि. ४) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजनी सुरू होणार आहे.
राज्यातील ४८ मतदार संघात उद्या मंगळवारी (दि. ४) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजनी सुरू होणार आहे.

Loksabha Election 2024 : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात उद्या मंगळवारी (दि. ४) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. राज्यात उद्या गैर प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

AP Election results : शरद पवारांविना राष्ट्रवादीला पहिलं यश, अजित पवार राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी दावा करणार

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. उद्या मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रानिहाय प्रत्येकी १४ टेबल ठेवण्यात आले आहे. तर टपाली मतपत्रीकांच्या मोजणीसाठीही १४ टेबल लावण्यात आले आहे. मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

Mumbai Bomb Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आरोपीचा तुरुंगात खून, ५ कैद्यांनी बेदम मारहाण करून केली हत्या

भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.)यांची नियुक्ती केली आहे.

सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

Maharashtra Weather Update : वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार! राज्यात 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

मतदान फेऱ्या

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. यामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ १८, शिवडी -१९, भायखळा -१९, मलबार हिल-२०,मुंबादेवी -१६, कुलाबा -२० अशा फेऱ्या होणार आहेत.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ

अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघ-१९, चेंबूर- २१, धारावी-१९, शीव-कोळीवाडा -१९, वडाळा-१८, माहिम १८,अशा फेऱ्या असतील.

तयारी पूर्ण

सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत.

Pune Accident : पुण्यात भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक! ६ वर्षाच्या मुलासह दोन जणांचा मृत्यू

राज्यात मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश रहाणार नाही. मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई करण्यात आली आहे.

पुण्यातील चार मतदार संघातील मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

पुणे जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांनी संगितले. बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव, ता. शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

प्रत्येक लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. मावळ लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया ११६, पुणे लोकसभा ११२, बारामती-१२४ व शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया ११२ टेबलद्वारे होणार आहे. मावळ मधील पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी १६ टेबल लावण्यात येणार मावळसाठी २४ तर पिंपरीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. तसेच पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ८ टेबल लावण्यात येणार आहेत.

पुणे लोकसभाअंतर्गत वडगाव शेरी २२, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट, कसबा पेठ प्रत्येकी १४, कोथरुड २० तर पर्वती विधानसभा मतदार संघ क्षेत्रासाठी १८ टेबलवर मतमोजणी होणार असून पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १० टेबलची व्यवस्था असेल. वडगाव शेरी २१, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, कसबा पेठ व पुणे कॅन्टोंमेंटसाठी प्रत्येकी २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.

बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड मतदारसंघासाठी १४ टेबल व २३ फेऱ्या, इंदापूर १६ टेबल व २१ फेऱ्या, बारामती १८ टेबल व २२ फेऱ्या, पुरंदर २० टेबल व २२ फेऱ्या, भोर २४ टेबल व २४ फेऱ्या तर खडकवासला विधानसभा मतदार संघासाठी २२ टेबल व २४ फेऱ्या होतील.

शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर मतदारसंघासाठी १४ टेबल व २५ फेऱ्या, आंबेगाव १४ टेबल व २४ फेऱ्या, खेड-आळंदी १६ टेबल व २४ फेऱ्या, शिरुर १६ टेबल व २७ फेऱ्या, भोसरी २० टेबल व २३ फेऱ्या तर हडपसर विधानसभा मतदार संघासाठी २० टेबल व २६ फेऱ्या होतील. पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १२ टेबल लावण्यात येणार आहेत.

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती

ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण ६५६ मतमोजणी सहायक, ६०० मतमोजणी पर्यवेक्षक आणि ६४० सूक्ष्म निरीक्षक असे एकूण १ हजार ८९६ मनुष्यबळ तर टपाली व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ४७ मतमोजणी पर्यवेक्षक, ६९ मतमोजणी सहायक आणि ५८ सूक्ष्म निरीक्षक असे १७४ याप्रमाणे एकूण २ हजार ७० मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.

वाहनतळ व्यवस्था

पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी येणारे मनुष्यबळ व उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमता असलेले दुचाकी वाहनतळ फक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी रोही व्हिला लॉन्स लेन नं.७, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमतेचे दुचाकी व चारचाकी वाहनतळ तर द पूना स्कूल ॲन्ड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी ८०० ते ९०० वाहनक्षमता असलेल्या चारचाकी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे.

 

WhatsApp channel