INDIA आघाडीला धक्का! TMC ने सर्व ४२ जागांवर जाहीर केले उमेदवार; युसूफ पठाण, महुआ मोईत्रांना तिकीट-west bengal tmc declares candidates names for loksabha election 2024 ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  INDIA आघाडीला धक्का! TMC ने सर्व ४२ जागांवर जाहीर केले उमेदवार; युसूफ पठाण, महुआ मोईत्रांना तिकीट

INDIA आघाडीला धक्का! TMC ने सर्व ४२ जागांवर जाहीर केले उमेदवार; युसूफ पठाण, महुआ मोईत्रांना तिकीट

Mar 10, 2024 05:32 PM IST

TMC Candidates List : पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. टीएमसीने सर्व ४२ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

टीएमसीकडून बंगालमधील सर्व जागांवर उमेदवार जाहीर
टीएमसीकडून बंगालमधील सर्व जागांवर उमेदवार जाहीर

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. टीएमसीने सर्व ४२ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बनर्जी यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. याबरोबर बंगालमध्ये इंडिया आघाडीची कोणतीही शक्यता राहिली नाही. टीएमसीच्या लिस्टमध्ये महुआ मोइत्रा आणि माजी क्रिकेटपटू यूसुफ पठाण यांच्या नावाचा समावेश आहे. यूसुफ पठानला बहरामपूर मतदारसंघातून अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे.

राहुल गांधी वायनाडमधून लढणार, लोकसभेसाठी काँग्रेसकडून ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ममता म्हणाल्या यूपीमध्ये अखिलेश यांच्याशी चर्चा सुरू आहे –

यापूर्वी कोलकाता येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली होती की, तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढेल. त्यांनी म्हटले की, देश कोणत्या दिशेला जाणार हे बंगाल ठरवेल. बंगालच देशाला रस्ता दाखवेल. त्याबरोबर त्यांनी आसाम व मेघालयातही निवडणूक लढण्याची घोषणा केली. ममता यांनी म्हटले की, तृणमूल काँग्रेस उत्तर प्रदेशमधील एका लोकसभा सीटवर निवडणूक लढण्याबाबत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करत आहे.

मिमी चक्रवर्ती, नुसरत जहाँ यांना उमेदवार नाही - 
टीएमसीच्या लिस्टमध्ये महुआ मोइत्रा यांचे नाव सामील आहे. मात्र नुसरत जहां व मिमी चक्रवर्ती यांचे तिकीट कापले आहे. मोईत्रा यांना कृष्णानगरमधून उमेदवारी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोलमधून तिकीट दिले आहे. अभिषेक बनर्जी यांना डायमंड हार्बर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. याशिवाय माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे बर्दवान दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या अहलुवालिया यांनी जिंकली होती. नुसरत जहाँच्या जागी हाजी नुरुल इस्लाम बशीतरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसची प्रतिक्रिया -
तृणमूल काँग्रेसने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आज थेट उमेदवारही घोषित केले. यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसने बंगालमध्ये तृणमूलसोबत अनेकदा जागावाटपाची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही पक्षांनी मिळून जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा आण इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपशी लढावे, अशी आमची इच्छा होती.

टीएमसीची मतदारसंघनिहाय उमेदवार यादी - 

  1. कूच बिहार (एससी)- जगदीश चंद्र बसुनिया

2- अलीपुरद्वार (एसटी)- प्रकाश चिक बड़ाईक
3- जलपाईगुडी (एससी)- निर्मल चौधरी रॉय
4- दार्जिलिंग- गोपाल लामा
5- रायगंज- कृष्णा कल्याणी
6- बालुरघाट- बिप्लब मित्रा
7- मालदा उत्तर- प्रसून बनर्जी
8- मालदा दक्षिण- शाहनवाज अली रेहान

9- जंगीपूर- खलीलुर्रहमान
10- बरहामपुर- युसूफ पठान
11- मुर्शिदाबाद- अबू ताहेर खान
12- कृष्णानगर- महुआ मोइत्रा
13- रानाघाट (एससी)- मुकुट मणि अधिकारी
14- बोंगाव- विश्वजीत दास
15- बैरकपुर- पार्थ भौमिक
16- दम दम- प्रोफेसर सौगत रॉय
17- बारासात- काकोली घोष दस्तीदार

18- बशीरहाट- नूरुल इस्लाम
19- जॉयनगर (एससी)- प्रतिमा मंडल
20- मथुरापुर (एससी)- बापी हलदर
21- डायमंड हार्बर- अभिषेक बनर्जी
22- जादवपुर- सायोनी घोष
23- कोलकाता दक्षिण- माला रॉय
24- कोलकाता उत्तर- सुदीप बंधोपाध्याय
25- हावडा- प्रसून बनर्जी
26- उलूबेरिया- सजदा अहमद
27- सेरामपुर- कल्याण बनर्जी
28- हुगली- रचना बनर्जी
29- आरामबाग (एससी)- मिताली बाग
30- तमलुक- देबांगशु भट्टाचार्य
31- कंठी- उत्तम बारिक
32- घाटल- दीपक अधिकारी (देव)
33- झारग्राम (एसटी)- कालीपाडा सोरेन
34- मेदिनीपुर- जून मालिया
35- पुरुलिया- शांतिराम महतो
36- बांकुरा- अरूप चक्रवर्ती
37- बिष्णुपुर (एससी)- सुजाता मंडल
38- बर्धमान पुरबा (एससी)- डॉ शर्मिला सरकार
39- बर्धमान दुर्गापुर- कीर्ति आजाद
40- आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
41- बोलपुर (एससी)- असित कुमार मल
42- बीरभूम- शताब्दी रॉयट

Whats_app_banner