मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024: 'अब की बार, ४०० पार' म्हणणारे २५०वर अडकले! नरेंद्र मोदी यांना आता 'या' दोन नेत्यांचा आधार

Lok Sabha Election 2024: 'अब की बार, ४०० पार' म्हणणारे २५०वर अडकले! नरेंद्र मोदी यांना आता 'या' दोन नेत्यांचा आधार

Jun 04, 2024 01:57 PM IST

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी ४००चा आकडा पार करण्याचा नारा दिला होता. मात्र, आज देशभरात मतमोजणी होत असताना भाजप केवळ २५० जागांवर अडकल्याचे दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांना आता 'या' दोन नेत्यांचा आधार
नरेंद्र मोदी यांना आता 'या' दोन नेत्यांचा आधार

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी ४००चा आकडा पार करण्याचा नारा दिला होता. मात्र, आज देशभरात मतमोजणी होत असताना भाजप केवळ २५० जागांवर अडकल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही आणि २७२चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची गरज भासणार आहे. अशा स्थितीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू हे भाजपला पाठिंबा देताना दिसत आहेत. बिहारमध्ये जेडीयू १५ जागांवर आघाडीवर असून, आंध्रमध्ये टीडीपीला १६ जागा मिळाल्या आहेत. एवढेच नाही, तर आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू आणि भाजपची युती जवळपास १५० जागांवर आघाडीवर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चंद्राबाबू नायडू यांना जवळपास लॉटरीच लागली आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील, तर केंद्र सरकारमध्येही त्यांचा हस्तक्षेप होणार आहे. यापूर्वीही, दोन्ही नेते किंगमेकर होते आणि अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सरकारचा भाग होते. अशाप्रकारे नायडू आणि नितीशकुमार यांच्यासाठी पुन्हा एकदा जुना काळ परतला आहे. नायडू यांच्यासाठी हे मोठे यश आहे. कारण, त्यांनी केवळ १७ जागा लढवल्या होत्या आणि ते त्यातील १६ जागांवर आघाडीवर आहेत. भाजपला टीडीपीच्या १६ जागा आणि जेडीयूच्या १४ जागा मिळाल्या, तर अंदाजे २४५ जागा असलेला पक्ष २७५चा दावा करत सरकार स्थापन करू शकेल. याशिवाय एकनाथ शिंदेयांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही ७ जागा जिंकताना दिसत आहे. अशा परिस्थितीत २८०पेक्षा जास्त आकडा पार करून सहज सरकार स्थापन करता येईल.

Mumbai North West Lok Sabha: रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोणाची विजयाच्या दिशेने वाटचाल?

‘या’ दोन नेत्यांची साथ गरजेची

चंद्राबाबू नायडू २०१४ आणि २०१९मध्ये भाजपमध्ये होते, परंतु नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यानंतर या वर्षी मार्चमध्ये ते एनडीएमध्ये परतले. इतकेच नाही तर, नितीश कुमार हे इंडिया अलायन्सची बांधणी करणारे नेते होते. परंतु, निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले. आता दोन्ही पक्ष मिळून बिहारमध्ये सरकार चालवत आहेत. अशा प्रकारे चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार निवडणुकीच्या आधी सोबत आल्याने हे भाजपसाठी चांगलेच झाले आहे. आता त्यांना हा आकडा पार करणे फारसे अवघड जाणार नाही आणि ते सहज सरकार स्थापन करू शकतील.

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागणार!

पवन कल्याण हे देखील एनडीएमध्ये आहेत, ज्यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत. तर, चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती रामविलासही ५ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. हा संपूर्ण आकडा एकत्र केला, तर एनडीएच्या खात्यात २९० जागा येऊ शकतात. अशाप्रकारे भाजप सरकार स्थापनेच्या मार्गावर आहे. मात्र, अपेक्षेनुसार या जागा फारच कमी आहेत. अशा प्रकारे एनडीए सरकारला त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

WhatsApp channel