मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Fake Vote: तुमच्या नावावर आधीच मतदान झालं, निवडणूक कर्मचाऱ्यांचं ऐकून मतदार शॉक; बोगस मतदानाचा व्हिडिओ समोर

Fake Vote: तुमच्या नावावर आधीच मतदान झालं, निवडणूक कर्मचाऱ्यांचं ऐकून मतदार शॉक; बोगस मतदानाचा व्हिडिओ समोर

May 20, 2024 03:02 PM IST

Fake Vote Viral Video: ठाण्यातील मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

ठाण्यातील बोगस मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ठाण्यातील बोगस मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HT)

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत असताना ठाणे मतदारसंघात बोगस मतदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेल्या एका मतदाराला त्याच्या जागी एका महिलेने मतदान केल्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितले. हे ऐकल्यानंतर संबंधित मतदाराला मोठा धक्का बसला. ही घटना आज सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेटच्या हनुमान नगर येथील मतदान केंद्र क्रमांक ८५ वर घडली. मतदाराने एका व्हिडिओद्वारे त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल व्हिडिओमध्ये मतदार स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी त्याचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे दाखवताना दिसत आहे.सेल्विन प्रभू नाडर असे या मतदाराचे नाव आहे. व्हिडिओत नाडर सांगत आहे की, लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी वागळे इस्टेटमधील हनुमान नगर येथील बूथ क्रमांक ८५ ला भेट दिली, जिथे त्याला मतदान करण्यापासून रोखले. याबाबत त्याने विचारणा केली असता निवडणूक आयोगाने दिलेले कारण ऐकून त्याला मोठा धक्का बसला. एका महिलेने आधीच त्याच्या नावावर मतदान केल्याचे निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितले.

"मी त्यांना विचारले की माझ्या जागी एक महिला मतदान कसे करू शकते? मी एक पुरुष आहे. यादीत माझा फोटो स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी मला यावर कोणतेही उत्तर दिले नाही", असे नाडर यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. नंतर तो त्याविरुद्ध आक्षेप नोंदवताना आणि मतदानाचा हक्क मागताना दिसतो.या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १३ मतदारसंघात १५.९३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धुळे- १७.३८, दिंडोरी- १९.५०, नाशिक- १६.३०, पालघर-१८.६०, भिवंडी- १४.७९, कल्याण- ११.४६, ठाणे- १४.८६, मुंबई उत्तर- १४.७१, मुंबई उत्तर पश्चिम- १७.५३, मुंबई उत्तर पूर्व- १७.०१, मुंबई उत्तर मध्य- १५.७३, मुंबई दक्षिण मध्य १६.६९ आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात १२.७५ टक्के मतदान झाले.

WhatsApp channel