Women Polling Officer in Red Suit : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडले. मागील लोकसभा निवडणुकीत लिंबू कलरच्या साडीतील रीना द्विवेदी नावाची पोलिंग अधिकारी व्हायरल झाली होती. यावेळी साडीतील नव्हे तर लाल भडक रंगाच्या सलवार-कुर्त्यातील हातात चूड़ा तसेच भांगेत कुंकू लावलेल्या शिखा चौहान नावाच्या महिलेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या महिला अधिकाऱ्याचे नाव शिखा सिंह चौहान आहे. शिखा सिंहची ड्यूटी लखनऊमधील केंट परिसरात लावली होती. शिखा सिंह चौहानची ही पहिलीच निवडणूक ड्यूटी होती. बँक अधिकारी शिखा सिंह यांना सेकेंड मतदान अधिकारी म्हणून निवडणुकीची जबाबदारी दिली होती. ही पहिलीच वेळ नाही की, निवडणूक ड्यूटीवरील महिला अधिकारी चर्चेत आली आहे. यापूर्वी लिंबू कलरमधील महिला अधिकारी चर्चेत आली होती.
दरम्यान लाल रंगाच्या ड्रेसमध्ये व्हायरल झालेल्या शिखाने सांगितले की, ही माझी पहिलीच पोलिंग ड्यूटी होती. मला उत्साह होता व कामाबाबत खूप एक्साइटेड होते. त्यातच मी व्हायरल झाल्यानंतर आणखी उत्साह आहे. लाल रंग तसा खूपच आकर्षक असतो त्यामुळे मी सर्वांच्या नजरेत आले.
शिखा म्हणाली की, महिला असताना फील्ड वर्क करणे खूप एक्सायटिंग काम आहे. माझ्या टीममधील अनेक महिलांना पोलिंग ड्यूटीची संधी दिली होती. मात्र सर्वांनी नकार दिला होता. माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी फील्ड ड्यूटी निवडली व तेथे पोहोचले. फील्ड ड्यूटीमध्ये सर्वकाही ठीक असते. मात्र महिलांना जर फील्ड वर्कवर ठेवले जात असले तर त्यांच्यासाठी चेंजिंग रूम आणि वाशरूमची सुविधा ठेवावी.
तिने महिला व तरुणींना संदेश दिला की, त्यांनी फेक फॅमिनिजमच्या जाळ्यात अडकू नये. जर त्यांना आपल्या अधिकारावर बोलायचे असेल तर आपले कर्तव्यही पार पाडले पाहिजे. काही महिलांना वाटत असते की, मी महिला असल्याने मला थोडा अधिक लाभ मिळायला पाहिजे. हा विचार बदलणे गरजेचे आहे.
शिखाचे शिक्षण लखनौमध्ये झाले असून ती नोकरीही याच शहरात करत आहे. तिने २०१२ मध्ये लखनौ यूनिवर्सिटीमधून पत्रकारितेत मास्टर डिग्री मिळवली. त्यानंतर २०१३ मध्ये तिने आपले फील्ड बदलले व बँकिंग सेक्टरमध्ये आली. शिखाने नुकतेच एक उद्योगपतीशी लग्न केले आहे. तिने सांगितले की, आई-वडिलांसारखेच सासरच्या लोकांकडूनही पाठिंबा मिळतो.